Eva Car : देशातली सर्वात स्वस्त कार, आयफोनच्या किमतीत आणा घरी, फिचर्स पाहून व्हाल थक्क!
कारमध्ये बसून प्रवास करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. कारण राज्य सरकारने जीएसटीमध्ये घट केल्यानंतर अनेक कारची किंमत खूपच कमी झाली आहे. विशेष म्हणजे एक कार तर अशी आहे जी तुम्हाला दोन आयफोनच्या किमतीत मिळू शकते.

Indias Most Cheap Car : अनेकांना वाटतं की आपल्याकडे एखादी कार असावी. कारमध्ये कुटुंबीयांना घेऊन फिरायला जावं, अशेही प्रत्येकालाच वाटते. परंतु कार खरेदी करणे प्रत्येकालाच जमत नाही. काही कारची किंमत ही लाखो रुपये आहे. काही कारची किंमत तर कोट्यवधी रुपये आहे. आता मात्र कारमध्ये बसून प्रवास करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. कारण राज्य सरकारने जीएसटीमध्ये घट केल्यानंतर अनेक कारची किंमत खूपच कमी झाली आहे. विशेष म्हणजे एक कार तर अशी आहे जी तुम्हाला दोन आयफोनच्या किमतीत मिळू शकते.
ही कार तुम्हाला चार लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकते. तिची किंमत फक्त 3.25 लाख रुपये आहे. भारतात सर्वात स्वस्त असलेल्या या कारचे नाव ईव्ही (Eva) असे आहे. ईव्हा ही एक इलेक्ट्रिक कार आहे. या कारमध्ये दोन व्यक्ती आणि एक लहान मुल निवांत बसून प्रवासू करू शकतात.
भारतातील सर्वात स्वस्त कार?
ईव्ही ही एक इलेक्ट्रिक व्हेइकल असणारी कार आहे. ही देशातील सर्वात स्वस्त कार असल्याचे बोलले जाते. या कारवर एक सोलार पॅनल असते. सूर्यप्रकाशाच्या मदतीने या कारला चार्जिंगह होते. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणाहून सहजपणे बाहेर पडू शकेल, अशी या कारची रचना केललेी आहे. ईव्हा या कारमध्ये ड्रायव्हिंग सिटवर एक आणि मागे एक व्यक्ती तसेच एक लहान मुल आरामात बसू शकते.
ईव्ही कारची किंमत, फिचर्स काय?
ईव्हा ही कार फक्त पाच सेकंदांत शून्य ते चाळीस किमीपर्यंतचा वेग धारण करू शकते. या कारमध्ये तुम्हाला तीन व्हेरिएंट्स मिळतात. Nova, Stella आणि Vega असे या व्हेरिएन्ट्सचे नाव आहे. एकदा चार्जिंग केल्यास ही कार साधारण 250 किमीपर्यंत प्रवास करू शकते, असे बोलले जाते. ईव्ही कारच्या नोवा मॉडेलची किंमत 3.25 लाख रुपये आहे. ही इलेक्ट्रिक कार एका महिन्यात साधारण 600 किमीपर्यंत प्रवास करू शकते. सोबतच एक किलोमिटरचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन रुपये लागतात. स्टेला मॉडेलची किंमत 3.99 लाख रुपये आहे. ही कार एका महिन्यात 800 किमीपर्यंतचा प्रवास करू शकते. या कारवरदेखील एक किलोमीटरच प्रवास करण्यासाठी दोन रुपये खर्च करावे लागतात. ईव्हा कारच्या तिसऱ्या मॉडेलचे नाव व्हेग असे आहे. या मॉडेलची किंमत 4.49 लाख रुपये आहे. ही कार एका महिन्यात 1200 किमीपर्यंत प्रवास करू शकते.
