AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयटेलचा आकर्षक फोन कमी किमतीत भारतात झाला लाँच, उत्तम डिझाइनसह जाणून घ्या फिचर्स

आयटेल ए१०० प्रो हा बजेट सेगमेंटमधील एक नवीन पर्याय आहे. यात मजबूत बॉडी, ९०Hz स्क्रीन आणि मोठी बॅटरी आहे. कंपनी मोफत स्क्रीन बदलून देण्याची सुविधाही देत ​​आहे. हा फोन सामान्य वापरासाठी आणि पहिल्यांदा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी डिझाइन केला आहे.

आयटेलचा आकर्षक फोन कमी किमतीत भारतात झाला लाँच, उत्तम डिझाइनसह जाणून घ्या फिचर्स
Itel A100 Pro
| Edited By: | Updated on: May 21, 2026 | 5:17 PM
Share

आयटेलने भारतात त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन itel A100 Pro लाँच केला आहे. कंपनीने हा फोन खास रग्ड डिझाइन आणि टिकाऊ बॉडीसह तयार केला आहे. तर हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 8 हजार 999 रूपयांच्या किंमत खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन, 90Hz डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कंपनी खरेदीच्या 100 दिवसांच्या आत मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा देखील देत आहे. ज्या वापरकर्त्यांना परवडणाऱ्या किमतीत एक मजबूत आणि विश्वासार्ह स्मार्टफोन हवा आहे, त्यांना डोळ्यासमोर ठेवून हा फोन लाँच करण्यात आला आहे.

उत्तम डिझाइन आणि वेगळ्या लुकवर फोकस

कंपनीने itel A100 Pro ची डिझाइन खास करून मजबूत आणि टिकाऊ बॉडीसह केली आहे. या फोनला मिलिटरी-ग्रेड MIL-STD-810H प्रमाणपत्र मिळाले आहे, ज्यामुळे तो अधिक मजबूत बनतो.

कंपनीचा दावा आहे की, हे डिव्हाइस रोजच्या वापरात कधी कधी हातातून फोन पडतो तसेच स्क्रॅच येणे या किरकोळ गोष्टींचा फोनवर फरक पडणार नाही. या फोनचा सर्वात आकर्षक रंग ‘कॉमेट ऑरेंज’ आहे, जो त्याला इतर बजेट फोन्सपेक्षा वेगळे ठरवतो. ब्लॅक आणि क्लाउड व्हाइट रंगांचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. वापरकर्त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी खरेदीच्या 100 दिवसांच्या आत स्क्रीन तुटल्यास कंपनी मोफत स्क्रीन बदलून देण्याची सुविधा देखील देत आहे.

डिस्प्ले, परफॉर्मेंस आणि सॉफ्टवेअर

itel A100 Pro मध्ये ९०Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.6-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले आहे. स्क्रीनमध्ये वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच डिझाइन असून, त्यात 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन युनिसॉक टी7100 प्रोसेसरवर चालतो, जो मूलभूत कामांसाठी डिझाइन केलेला आहे.

तसेच या फोनमध्ये व्हॉट्सॲप चॅटिंग, यूट्यूब व्हिडिओ पाहणे आणि हलके गेमिंग यांसारखी कामे सहजपणे हाताळली जातात. हा फोन 3GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो, ज्यामध्ये रॅम बूस्ट फीचरद्वारे 8GB पर्यंत स्टोरेज वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 15 गो एडिशनवर चालतो आणि यात डायनॅमिक बार फीचर देखील आहे.

बॅटरी आणि कॅमेरा, फिचर्स

या फोनमध्ये मोठी 5000mAh बॅटरी आहे. हे डिव्हाइस 10W चार्जिंग सपोर्टसह येते आणि त्याची जाडी 8.49mm आहे. मागील बाजूस 8-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, जो रोजच्या फोटोग्राफीसाठी वापरला जाऊ शकतो. उत्तम मीडिया आणि म्युजिक अनुभवासाठी DTS सपोर्टसह एक स्पीकर दिला आहे. या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना वायर्ड इअरफोन सहजपणे वापरता येतात.

Follow Us
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...