पुढील 5 वर्षात 20 लाख इलेक्ट्रिक वाहनांसाठी देशात 4 लाख चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची गरज : रिपोर्ट

भारतात 2026 पर्यंत 20 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) रस्त्यांवर धावताना दिसतील, परंतु या 20 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारताला सुमारे 400,000 चार्जिंग स्टेशनची आवश्यकता असेल.

पुढील 5 वर्षात 20 लाख इलेक्ट्रिक वाहनांसाठी देशात 4 लाख चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची गरज : रिपोर्ट
Electric charging point
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 5:14 PM

नवी दिल्ली : भारतात 2026 पर्यंत 20 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) रस्त्यांवर धावताना दिसतील, त्यादृष्टीने सरकारने पावलं उचलली आहेत. परंतु या 20 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारताला सुमारे 400,000 चार्जिंग स्टेशनची आवश्यकता असेल. असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. (Kia EV6 runs 112KM in 5 minute charging, EV breaks all records and booked all the car in few hour)

ग्रँट थॉर्नटन इंडिया-फिक्कीच्या अहवालात म्हटले आहे की, 2030 पर्यंत भारताचे 100 टक्के ईव्ही स्वीकारण्याचे लक्ष्य आहे. यासाठी सरकारचे सहकार्य वाढविण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. ईव्ही उद्योग संस्थेच्या सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्सनुसार मार्च 2021 पर्यंत भारतामध्ये सुमारे 16,200 इलेक्ट्रिक कारसाठी 1,800 चार्जिंग स्टेशन्स आहेत.

अहवालात असे म्हटले आहे की, ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर हे ईव्ही आणि चार्जिंग स्टेशन वैशिष्ट्ये, बॅटरी तंत्रज्ञान आणि वीज बाजारांशी घट्ट जोडलेलं आहे. या अहवालात अर्ध्याहून अधिक भागधारकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार इलेक्ट्रिक व्हेईकल सप्लाय इक्विपमेंटच्या (ईव्हीएसई) तैनाती आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचे वर्गीकरण करण्याचीही शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

अहवालात पुढे असे म्हटले आहे की, जागतिक उत्पादकांनी ईव्ही चार्जर्सची उपलब्धता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत आणि परिणामी, आज सर्वात वेगवान क्षमतेसह वाहन रीचार्ज करण्यास 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. अहवालानुसार, जागतिक पातळीवर ईव्हीएसची विक्री वार्षिक आधारावर 2020 मध्ये 39 टक्क्यांनी वाढून 31 लाख वाहनांवर गेली आहे, तर एकूण प्रवासी कार बाजारात 14 टक्क्यांनी घट झाली आहे.

इंधनाचे वाढते दर, नागरिकांचा मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे

भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.

संबंधित बातम्या

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा बाजारात धुमाकूळ, अवघ्या काही तासांत सर्व युनिट्सची विक्री, 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112KM रेंज

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

(Kia EV6 runs 112KM in 5 minute charging, EV breaks all records and booked all the car in few hour)

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.