
GST मध्ये केलेल्या बदलानंतर अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. याचा ऑटो क्षेत्रावर देखील परिणाम झाला आहे. तुम्ही नवी कार घेण्याचा विचार करत असाल तर नव्या बदलानुसार किती GST भरावा लागेल, हे माहिती असणे देखील गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला नव्या Hyundai Creta वर किती GST लागेल, याची माहिती देणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया.
नुकतीच केंद्र सरकारने वाहनांवरील GST मध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. नवी कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण GST चा थेट परिणाम वाहनांच्या किमतीवर होतो आणि त्यात कपात केल्याने वाहनांच्या किमती कमी होणार आहेत.
GST चे नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. GST कपातीनंतर वाहनांच्या किंमतीत किती कपात होणार, याबाबत लोकांच्या मनात उत्सुकता आहे. मारुती सुझुकी वॅगनआर, टाटा नेक्सॉन, टाटा टियागो, टाटा पंच कामेट अशा अनेक वाहनांच्या किंमतीत कपात झाल्याची माहिती आम्ही तुम्हाला आधीच दिली आहे. या भागात आज आम्ही तुम्हाला ह्युंदाई कंपनीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार क्रेटाच्या किंमतीत संभाव्य कपातीची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कारची किंमत किती कमी होईल.
काय आहे नवा GST स्लॅब?
मोदी सरकारने नव्या GST स्लॅबला मंजुरी दिली आहे. नव्या प्रणालीनुसार ज्या वाहनांचे इंजिन 1500 सीसीपेक्षा जास्त असेल अशा वाहनांवर आता 28 टक्क्यांऐवजी 40 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. परंतु, चांगली बाब म्हणजे या वाहनांवरील सेस टॅक्स आता पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. यापूर्वी सेस आणि GST सह वाहनांवरील एकूण GST 45 ते 50 टक्क्यांपर्यंत जात होता. परंतु, आता केवळ 40 टक्के कर आकारला जाणार असल्याने वाहनांच्या किमती कमी होतील.
कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार
ह्युंदाई क्रेटा ही 1500 सीसी इंजिन असलेली कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. पूर्वी त्यावर सुमारे 50 टक्के (25 टक्के GST + 22 टक्के सेस) कर आकारला जात होता. या प्रणालीनुसार आता त्यावर केवळ 40 टक्के GST आकारला जाणार असून, त्यामुळे वाहनावरील कर सुमारे 10 टक्क्यांनी कमी होणार आहे. याचा परिणाम किंमतीवरही होणार आहे.
ह्युंदाई क्रेटाची किंमत किती असेल?
नवीन GST स्लॅब लागू झाल्याने क्रेटाची किंमत सुमारे 75 हजार ते 1 लाख 40 हजारांपर्यंत कमी होऊ शकते, जी मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार बदलू शकते. क्रेटाच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत सध्या 11.11 लाख ते 20.76 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.
नवीन GST स्लॅब लागू झाल्यानंतर त्याची किंमत 10.36 लाख ते 19.37 लाखांच्या दरम्यान असेल. तर GST कपातीनंतर क्रेटाच्या डिझेलमध्येही लक्षणीय कपात होऊ शकते, जी 84 हजार ते 1 लाख 39 हजारांच्या दरम्यान असू शकते. या कारची किंमत 11.85 लाख ते 19.53 लाख रुपयांदरम्यान असेल.