AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमाईला तयार राहा रे! TikTok ची घरवापसी; मोठी अपडेट माहिती झाली का?

TikTok come back in India : भारतात TikTok ची घरवापसीची चर्चा जोरात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यानंतर या चर्चांना हवा मिळाली आहे. त्यातच आता टिकटॉक कंपनीने एक मोठी अपडेट दिल्याने बंदी हटवण्याचे मोठे संकेत मिळाले आहेत.

कमाईला तयार राहा रे! TikTok ची घरवापसी; मोठी अपडेट माहिती झाली का?
टिकटॉकची ती मोठी अपडेट
| Updated on: Sep 06, 2025 | 3:46 PM
Share

TikTok Recruitment : टिकटॉकची घरवापसी होत असल्याची चर्चा जोरात आहे. सध्या भारतात TikTok वर बंदी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावरून परत आले आहेत. त्यातच कंपनीने एक मोठी अपडेट दिल्याने बंदी हटण्याचे संकेत मिळत आहेत. कंपनीने भारतात नवीन कर्मचारी भरती सुरू केली आहे. कंपनीने LinkedIn वर TikTok साठी दोन नवीन रिक्त जागा भरतीसाठी जाहिरात पोस्ट केली आहे. गुरुग्राम येथील कार्यालयासाठी या नवीन जागा असतील. यामुळे लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म पुन्हा भारतात दाखल होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

TikTok साठी सध्या काय अट?

चीनची टेक कंपनी ByteDance कडे TikTok ची मालकी आहे. जून 2020 मध्ये भारत-चीन नियंत्रण रेषेवरील तणावानंतर देशात टिकटॉकवर बंद आणण्यात गेली. 59 चीन ॲप्सची भारतातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यात टिकटॉक पण होते. डेटा प्रायव्हेसी अंतर्गत भारत सरकारने ही कारवाई केली होती. देशात टिकटॉकचे त्यावेळी जवळपास 20 कोटी युझर्स होते. जगात भारत ही कंपनीची मोठी बाजारपेठ होती.

बंदी घातल्यापासून हे ॲप Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध नाही. तर काही दिवसांपूर्वी काही युझर्सने सांगितले की, टिकटॉकची वेबसाईट आता ॲक्सेस होत आहे. पण सरकारी अधिकाऱ्यांनी या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. टिकटॉकवरील बंदी हटविण्यासंदर्भात कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचे सरकारच्या सूत्रांनी माहिती दिली.

दोन पदांसाठी भरती प्रक्रिया

देशात टिकटॉकवर सध्या बंदी आहे. तरी कंपनीने गुरुग्राम कार्यालयात दोन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. दोन्ही नोकऱ्या या कंपनीच्या Trust and Safety विभागासाठी आहे. कंटेंट मॉडरेशन आणि युझर्स सेफ्टीवर कर्मचारी लक्ष ठेवतील. पहिला जॉब हा कंटेंट मॉडरेटर तर दुसरी नोकरी जॉब वेलबीईंग पार्टनरशिप अँड ऑपरेशन्स लीडसाठी असेल. अर्थात कंपनीने भारतात कमबॅकविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण चीन हा घातकी असल्याचे दिसून आले आहे. अशात चीनसाठी लागलीच भारतीय बाजारपेठ उघडी करणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारत-पाकिस्तान संघर्षात चीनने उघडपणे पाकड्यांची बाजू घेतली. शस्त्र पुरवले हे विसरून चालणार नाही.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.