AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra Scorpio N : लोकांना महिंद्रा स्कॉर्पिओचं वेड, अर्ध्या तासात एका लाखाहून अधिक गाड्या बूक, पसंतीची ही 5 कारणं जाणून घ्या..

सुरुवातीपासूनच स्कॉर्पिओबाबत ऑटो मार्केटमध्ये प्रचंड क्रेझ आहे. कंपनीनx ही कार बिग डॅडी एसयूव्हीच्या नावाने लाँच केलीय. स्कॉर्पिओच्या त्या पाच फीचर्सबद्दल जाणून घ्या ज्यामुळे लोकांना नवीन SUV आवडते. 

Mahindra Scorpio N : लोकांना महिंद्रा स्कॉर्पिओचं वेड, अर्ध्या तासात एका लाखाहून अधिक गाड्या बूक, पसंतीची ही 5 कारणं जाणून घ्या..
Mahindra ScorpioImage Credit source: social
| Updated on: Aug 01, 2022 | 3:16 PM
Share

नवी दिल्ली : Mahindra Scorpio Nचं अधिकृत बुकिंग सुरु झालंय. या नवीन एसयूव्ही (SUV) बद्दल लोकांमध्ये एवढी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे की, अर्ध्या तासात कंपनीनं सर्व रेकॉर्ड मोडत 1 लाख स्कॉर्पिओचं बुकिंग नोंदवलं आहे. सुरुवातीपासूनच स्कॉर्पिओबाबत ऑटो मार्केटमध्ये प्रचंड क्रेझ आहे. कंपनीनं ही कार बिग डॅडी एसयूव्हीच्या नावानं लोकांमध्ये लाँछ केली आहे. स्कॉर्पिओच्या त्या पाच फीचर्सबद्दल जाणून घेऊया ज्यांचं लोक या नवीन SUV बद्दल वेड लागले आहेत. Mahindra Scorpio N मध्ये कंपनीनं एकामागून एक नवीन फीचर्स दिलं आहेत. यामध्ये कंपनीनं पूर्णपणे डिजिटल कन्सोल इन्स्ट्रुमेंट दिलं आहे. यामध्ये कंपनीने मोठ्या आकाराची 8 इंची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देखील दिली आहे. हे डिजिटल कन्सोल इन्स्ट्रुमेंट कारच्या इंटीरियरला वेगळा लूक देते. या नव्या Mahindra Scorpio Nविषयी अधिक जाणून घ्या. यामुळे तुम्हाला देखील या कारविषयी माहिती होईल आणि तुमच्याकडे एक चांगला पर्याय असेल.

कोणते दोन पर्याय?

कंपनीने स्कॉर्पिओमध्ये दोन प्रकारचे आसन व्यवस्था पर्याय दिले आहेत. यामध्ये तुमच्या आवडीचा आसन पर्याय तुम्ही  निवडू शकता. जसं की तुम्हाला तीन सीट फ्रंट फेसिंग हवं आहे की जुन्या स्टाइलच्या तिसऱ्या रांगेचं सीट हवं आहे. ते तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. तसेच ग्राहकांना मागच्या सीटवर जाण्यासाठी दुसरी सीट फोल्ड करावी लागणार नाही, तिसर्‍या सीटसाठी वेगळी जागा असेल याची काळजी कंपनीनं घेतली आहे.

नवीन स्टाइलिश डिझाइन

कंपनीने नवीन स्कॉर्पिओ एनचे डिझाइन जुन्या स्कॉर्पिओच्या डिझाइनपेक्षा वेगळं केलं आहे. एलईडी हेडलॅम्प सुंदर सी-आकाराचं डीआरएल. तसेच, कंपनीने या स्कॉर्पिओची बॉडी लाइन वक्र आकारात ठेवली आहे. त्याची टेल लाईट C आकारात असेल.

महिंद्राचा नवीन लोगो

नवीन स्कॉर्पिओचे केवळ आतील भागच नाही तर बाह्य रूप देखील खूप बदलले आहे. नवीन लोखंडी जाळीची रचना खूपच आकर्षक दिसते. याशिवाय महिंद्राचा नवीन लोगो याला अधिक दमदार लुक देत आहे. लूकमध्ये हे अगदी XUV700 सारखे दिसते.

4WD प्रणाली

नवीन Scorpio मध्ये कंपनीने 4X4 ची गाडी देखील दिली आहे. पण ही ऑप्शन व्हर्जन फक्त डिझेलमध्ये उपलब्ध आहे, पेट्रोलसाठी नाही. ही 4X4 आवृत्ती सामान्य रस्ता, गवत, बर्फ, चिखल आणि वाळूमध्ये देखील यशस्वी आहे.

आता या नव्या गाडीचे फीचर्स आणि किंमत देखील तुम्ही जाणून घेतलं आहे. आता हा एक नवा पर्याय तुमच्याकडे असणार आहे.

'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.