लॉकडाऊनमध्येही जोरदार विक्री, Mahindra च्या ‘या’ कारमध्ये काय आहे खास?

सेकेंड जनरेशन Mahindra Thar SUV ला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. लाँचिंगच्या 8 महिन्यांनंतरही या कारचा भारतीय बाजारात धुमाकूळ पाहायला मिळतोय.

लॉकडाऊनमध्येही जोरदार विक्री, Mahindra च्या 'या' कारमध्ये काय आहे खास?
Mahindra Thar

मुंबई : सेकेंड जनरेशन Mahindra Thar SUV ला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. लाँचिंगच्या 8 महिन्यांनंतरही या कारचा भारतीय बाजारात धुमाकूळ पाहायला मिळतोय. या भारतीय ऑफ-रोड एसयूव्हीने 55,000 बुकिंग्स मिळविले आहेत. या SUV ला दरमहा सरासरी 5000 बुकिंग्स मिळत आहेत. एप्रिलमध्ये महिंद्राने जाहीर केले की, त्यांनी थारच्या 50,000 बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे. महिंद्राने म्हटले आहे की, या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटला मोठी मागणी आहे. (Mahindra Thar SUV gets over 55,000 bookings Even after Covid-19 Lockdown)

कंपनीने म्हटले आहे की दर 2 थारपैकी एक ऑटोमॅटिक कार आहे, ज्या कारची जोरदार विक्री सुरु आहे. आहे. महिंद्रा थारच्या एकूण विक्रीत ऑटोमॅटिक कारचे योगदान 47 टक्के आहे. नवीन थार एसयूव्ही मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्यात आली होती. 4X4 एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 12.11 लाख रुपये आहे, या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 14.16 लाख रुपये इतकी आहे.

तथापि, महिंद्रा अद्याप ग्राहकांसाठी या कारचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरियड) कमी करू शकलेली नाही. सध्या या वाहनासाठीचा प्रतीक्षा कालावधी 10 महिने इतका आहे. दरम्यान, महिंद्राने असे म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या नाशिक प्लांटमधील उत्पादनात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या कारचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यात मदत मिळेल.

सेकंड जनरेशन महिंद्रा ‘THAR 2020’ची वैशिष्ट्ये

जुन्या महिंद्रा थारच्या तुलनेत नवीन महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये बऱ्यापैकी कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह नवी महिंद्रा ‘THAR 2020’ खरेदी करू शकतात. या नव्या ‘THAR 2020’मध्ये 4 सीट आणि 6 सीट, असे सीटिंग लेआउट पर्याय देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2.0 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन, 150 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. तर, 2.2 लीटर डिझेल इंजिनने 130 बीएचपीची पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट केले जाते. या नव्या ‘THAR 2020’मध्ये बीएस 6 इंजिन देण्यात आले असून, 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारच्या उर्वरित वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 9 वेरियंटसह रेड रेज, गॅलेक्सी ग्रे, मिस्टिक कॉपर, रॉकी बेज, नेपोली ब्लॅक आणि अ‍ॅक्वामरीन या वेगवेगळ्या रंगात ‘THAR 2020’ लाँच केली गेली आहे.

महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट, अ‍ॅडजेस्टेबल सीट, रूफ माउंट स्पीकर्स, क्रूझ कंट्रोल, ड्युअल एअरबॅग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, हिल कंट्रोल, डिजिटल ओडोमीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, असे फीचर्स देण्यात आले आहेत. महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये खास चौकोनी एलईडी टेललाईट्स, स्पोक अ‍ॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Mahindra Thar 2020 खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल

Mahindra THAR चा मार्केटमध्ये धुमाकूळ, तरीही कंपनी कार बंद करण्याच्या विचारात?

क्रॅश टेस्टमध्ये Mahindra THAR पास की नापास?

(Mahindra Thar SUV gets over 55,000 bookings Even after Covid-19 Lockdown)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI