AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra Thar | ग्राहकांची पहिली पसंत महिंद्रा थार, Maruti Suzuki Jimny मध्ये नेमकं काय गडबडलं?

Mahindra Thar vs Maruti Suzuki Jimny | Mahindra Thar ला टक्कर देण्याच्या इराद्याने Maruti Suzuki Jimny ला मार्केटमध्ये आणलं होतं. जानेवारी 2023 मध्ये ग्रँड एंट्री झाली होती. पण विक्रीमध्ये आजही महिंद्राची थार सरस आहे. उलट Maruti Suzuki Jimny च्या विक्रीत घसरण होतेय. असं का झालं? त्यामागे काय कारण आहेत?.

Mahindra Thar | ग्राहकांची पहिली पसंत महिंद्रा थार, Maruti Suzuki Jimny मध्ये नेमकं काय गडबडलं?
Mahindra Thar vs Maruti Suzuki JimnyImage Credit source: Maruti Suzuki/Mahindra
| Updated on: Dec 25, 2023 | 12:24 PM
Share

Mahindra Thar | जानेवारी 2023 मध्ये Auto Expo च आयोजन करण्यात आलं होतं. त्यात Maruti Suzuki Jimny ची ग्रँड एंट्री झाली. मारुतीसाठी हा क्षण खूप खास होता. कारण त्यांच्या लाइनअपमध्ये एक नवीन ऑफ रोड SUV दाखल होणार होती. दुसऱ्याबाजूला या ग्रँड एंट्रीमुळे थोडी धाकधूकही होती. मारुतीच्या नवीन कारपासून महिंद्राच्या थारला थेट धोका होता. मारुतीची नवीन SUV थारचा मार्केट शेअर कमी करणार असं बोलल जात होतं. आकड्यांवर नजर टाकली, तर जिम्नीची हालत फार चांगली नाहीय. थार अजूनही आपल स्थान टिकवून आहे.

नोव्हेंबर 2023 चे आकडे पाहिले, तर जिम्नीच्या विक्रीमध्ये जवळपास 45 टक्के घसरण झालीय. सुरुवातीला या कारसाठी भरभरुन बुकिंग झाली होती. पण मागच्या काही महिन्यांपासून या कारला ग्राहक मिळत नाहीयत. मागच्या महिन्यात जिम्नीच्या फक्त 1,020 यूनिट्सची विक्री झाली. तेच महिंद्रा थारच्या 5,810 यूनिट्स विकल्या गेल्या. जिम्नीच्या विक्रीत घसरण का झाली? ते जाणून घ्या.

Thar vs Jimny: कशी मागे पडली मारुतीची जिम्नी

महिंद्र थार अनेक बाबतीत मारुतीच्या जिम्नीपेक्षा सरस आहे. जिम्नी आल्यानंतरही थार आपला दबदबा कसा टिकवून आहे, ते समजून घेऊया.

Size : महिंद्रा थार साइजच्या बाबतीत मारुती जिम्नीपेक्षा मोठी आहे. थारचा रोड प्रेजेन्सही जिम्नीपेक्षा दमदार आहे. थारच्या तुलनेत जिम्नी रुंदी आणि उंची कमी आहे. त्याशिवाय थारचा ग्राऊंड क्लियरन्सही जास्त आहे.

Engine : मारुति जिम्नी एक इंजिन 1.5 लीटर नेच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते. तेच महिंद्रा थारवर 1.5 लीटर डीजल इंजिन, 2.2 लीटर डीजल इंजिन आणि 2.0 लीटर पेट्रोल इंजिन येतं. ग्राहकांना आपल्या गरजेच्या हिशोबाने पर्याय मिळतात.

Roof : जिम्नीची लोकप्रियता कमी होतेय, त्यामागे महिंद्रा थारच्या छताचा सुद्धा हात असू शकतो. ऑफ-रोड एसयूवी खरेदी करणाऱ्या कस्टमर्सची सॉफ्ट-टॉप रूफला पसंती असते. हा पर्याय थारमध्ये मिळतो. जिम्नीच हार्डटॉप रूफ आहे. थारमध्ये सुद्धा हा ऑप्शन आहे.

थार सरस का? किंमत

भारतात आजही जुन्या जीपला पंसती देणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. महिंद्रा थार जीपचा वारसा पुढे चालवतेय. आजच्या जमान्यात कोणाला जीप घ्यायची असेल, तर त्याची पसंती थारला आहे. त्याशिवाय किंमतही एक कारण आहे. महिंद्रा थारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.98 लाख रुपये आहे. दुसऱ्याबाजूला, मारुती जिम्नीची स्टार्टिंग एक्स-शोरूम प्राइस 12.74 लाख रुपये आहे. मारुतीने अलीकडेच लिमिटेड पीरियडसाठी Jimny Thunder Edition काढलं, ज्याची एक्स-शोरूम किंमत 10.74 लाख रुपये आहे.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.