AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car : कार खरेदी करायची! किती प्रतीक्षा कालावधी लागणार?, जाणून घ्या…

भारतात विक्री होत असलेल्या सर्वच कार्समध्ये महिंद्रा एक्सयुव्ही 700 ला सर्वांधिक प्रतीक्षा कालावधी आहे. जर तुम्ही देखील महिंद्रा एक्सयुव्ही 700 खरेदी करणार असाल तर, तुम्हाला काही व्हेरिएंटच्या डिलीव्हरीसाठी जवपास दोन वर्ष वाट पहावी लागणार आहे. दुसरीकडे महिंद्रा थारचा प्रतीक्षा कालावधीदेखील काही व्हेरिएंटसाठी जवळपास एक वर्षांचा आहे.

Car : कार खरेदी करायची! किती प्रतीक्षा कालावधी लागणार?, जाणून घ्या...
कारImage Credit source: social
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 12:29 PM
Share

मुंबई : सध्या भारतीय ऑटोमोबाईलमध्ये (Automobile) चलतीचे दिवस सुरु आहेत. जवळपास सर्वच सेगमेंटमधील कार्सला ग्राहकांकडून चांगली मागणी वाढली आहे. खासकरुन नवीन लाँच होत असलेल्या गाड्यांना अधिक बुकिंग मिळत आहे. त्यातच सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्याच्या सारख्या अनेक कारणांमुळे कार निर्मात्या कंपन्या ग्राहकांच्या मागणीऐवढा गाड्यांचा पुरवठा करण्यास अकार्यक्षम ठरत आहेत. यामुळे जर तुम्ही एखाद्या गाडीची बुकिंग (Booking) करत असाल तर ती गाडी तुम्हाला अनेक महिन्यांनी मिळू शकते. अनेक गाड्या अशाही आहेत, ज्यांच्यासाठी ग्राहकांना एक वर्षाहुन अधिक कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. जुलै 2022 मध्ये पाहिले तर, अनेक लोकप्रिय मॉडेल्सचा प्रतीक्षा कालावधी (waiting period) हा 4 महिन्यांपासून ते 22 महिन्यांपर्यंतचा आहे. या लेखातून जाणून घेउया कोणत्या कारचा किती प्रतीक्षा कालावधी आहे.

या कार्सची करावी लागणार प्रतीक्षा

भारतात विक्री होत असलेल्या सर्वच कार्समध्ये महिंद्रा एक्सयुव्ही 700 ला सर्वांधिक प्रतीक्षा कालावधी आहे. जर तुम्ही देखील महिंद्रा एक्सयुव्ही 700 खरेदी करणार असाल तर, तुम्हाला काही व्हेरिएंटच्या डिलीव्हरीसाठी जवपास दोन वर्ष वाट पहावी लागणार आहे. दुसरीकडे महिंद्रा थारचा प्रतीक्षा कालावधीदेखील काही व्हेरिएंटसाठी जवळपास एक वर्षांचा आहे.

एक वर्षांचा प्रतीक्षा कालावधी असलेल्या कार

देशात महिंद्रा एक्सयुव्ही 700 आणि महिंद्रा थारला मोठी मागणी वाढली आहे. नुकत्याच लाँच झालेल्या महिंद्रा स्कॉर्पियो एन देखील लवकरच प्रतीक्षा कालावधीमध्ये एक्सयुव्ही 700 आणि महिंद्रा थारला मागे टाकेल अशी शक्यता आहे. किआ करेंस देखील नुकतीच लाँच झाली असून त्याच्या काही व्हेरिएंटसाठी ग्राहकांना एक वर्षांचा प्रतीक्षा कालावधी आहे. परंतु जास्त करुन गाड्यांचा प्रतीक्षा कालावधी हा तीन ते पाच महिन्यांपर्यंतचा आहे.

(कार, प्रतीक्षा कालावधी)

  • महिंद्रा एक्सयुव्ही 700 – 22 महिने
  • महिंद्रा थार – एक वर्ष
  • किआ करेंस – एक वर्ष
  • मारुती अर्टिगा – 7 महिने (CNG व्हेरिएंटसाठी 9 महिने)
  • किआ सोनेट – 7 महिने
  • ह्युंदाई क्रेटा – 7 महिने
  • टोयोटा फार्च्यूनर – 7 महिने
  • मारुती बलेनो – 4 महिने
  • टाटा नेक्सोन – 4 महिने (EV साठी 5 महिने)
  • ह्युंदाइ वेन्यू – 4 महिने

सीएनजी व्हेरिएंटसाठी लागणार विलंब

मारुती अर्टिगा देशातील सर्वाधिक जास्त विकली जाणारी एमपीव्ही आहे. याच्या बुकिंग आणि डिलिव्हरीमध्ये 5 ते 7 महिन्यांचे अंतर आहे. याच्या सीएनजी व्हेरिएंटला अधिकच मागणी आहे. सीएनजी व्हेरिएंटचा वेटिंग पीरिएड 7 ते 9 महिन्यांपर्यंत आहे. दुसरीकडे ह्युंदाई क्रेटाचा डिलिव्हरीसाठीचा प्रतीक्षा कालावधी 4 ते 7 महिन्यांचा आहे.

सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?.
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष.