Maruti Brezza आणि Nexon कोणती आहे बेस्ट कार?, किंमत आणि परफॉर्मेंस काय ? येथे जाणा माहिती
Maruti Suzuki Brezza vs Tata Nexon : मारुती ब्रेझा आणि टाटा नेक्सॉन या दोन्ही कार मिड बजेट रेंजच्या आहेत. या दोन्ही कार उत्तम असल्या तरी दोन्ही पैकी कोणता पर्याय अधिक चांगला आहे. याची माहिती घेऊयात...दोन्ही कारचा सेफ्टी, परफॉर्मेंस आणि मायलेज संबंधीची माहिती पाहूयात...

मारुती ब्रेझा आणि टाटा नेक्सॉन यापैकी कोणत्या कारला घेणे चांगला निर्णय आहे याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मारुती ब्रेझा हिला अलिकडे ६ एअरबॅग स्टँडर्ड सेफ्टीसह अपडेट केले आहे. त्यामुळे मारुती ब्रेझाच्या बेस व्हेरिएंटमध्ये संपूर्ण सेफ्टी देण्यात आली आहे. मार्केटमध्ये मारुती सुझुकी ब्रेझाचा मुकाबला टाटा नेक्सॉनशी आहे. ब्रेझा हिला चांगल्या मायलेजसाठी ओळखले जाते तर टाटा नेक्सॉनला मजबूती आणि सेफ्टीसाठी ओळखले जाते. तर पाहूयात कोणती कार चांगली आहे. ?
दोनही कारच्या किंमतीची तुलना
टाटा नेक्सॉनची एक्स शोरुम किंमत ७.९९ लाख रुपयांपासून सुरु होऊन ती १५.५० लाखापर्यंत जाते. तर मारुती ब्रेझा कारची किंमत ८.३४ लाखापासून सुरु होते. या कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरुम किंमत १४.१४ लाखांपर्यंत जाते. टाटा नेक्सॉनला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार सेफ्टी रेंटिंग मिळालेली आङे. तर मारुती ब्रेझाला ४ – स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. टाटा नेक्सॉन कारमध्ये ३८२ लिटरच्या बूट स्पेस मिळतो. तर ब्रेझा मध्ये ३२८ लिटरचा बूट स्पेस मिळतो.
मारुती ब्रेझाचे इंजिन क्षमता
मारुती ब्रेझा एक हायब्रिड कार आहे. या कारचे इंजिन K15 C पेट्रोल + CNG ( बाय-फ्यूएल) क्षमतेचे आहे. तर गाडीला लावलेले इंजिन पेट्रोल मोडवर ६ हजार आरएमपी वर १००.६ PS ची पॉवर देते. आणि ४,४०० rpm वर १३६ Nm चा टॉर्क जनरेट करते.




तर सीएनजी मोडवर या गाडीतून ५,५०० rpm वर ८७.८ PS ची पॉवर आणि ४,२०० rpm वर १२१.५ Nm चा टॉर्क मिळतो. मारुतीची कार २५.५१ km/kg चा मायलेज देते.
टाटा नेक्सॉन कारचा मायलेज
टाटा नेक्सॉन ही काही हायब्रिट कार नाही. परंतू ही पेट्रोल , डिझेल आणि सीएनजी या तिन्ही पॉवर ट्रेनच्या पर्यायासह येते. टाटाच्या या कारमध्ये १.२ लिटर टर्बोचार्ज्ड रेव्होट्रॉन इंजिन लावलेले आहे. या इंजिनापासून ५,५०० rmp वर ८८.२ PS ची पॉवर मिळते. आणि १,७५० ते ४,००० rpm वर १७० Nmच्या टॉर्क जनरेट होतो. टाटा नेक्सॉन १७ ते २४ kmpl चा मायलेज देते.