AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाची पहिली सोलर कार आली, पाहा किती आहे किंमत आणि रेंज…

देशातील कार उद्योगात झपाट्याने बदल होत आहेत. एकीकडे, इलेक्ट्रीक कारमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येताना दिसत आहे. आता तर सौरऊर्जेवर चालणारी कार भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे.

देशाची पहिली सोलर कार आली, पाहा किती आहे किंमत आणि रेंज...
Vayve Eva
| Updated on: Jan 19, 2025 | 5:09 PM
Share

देशात कार इंडस्ट्री सध्या तुफान तेजी आहे. एकीकडे नवनवीन कार बाजारात येत आहेत. तर दुसरीकडे इलेक्ट्रीक कारचे मार्केट तेजीत आहे. आता भारतीय बाजारात तर सोलर कारचा प्रवेश झाला आहे. ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो – २०२५’ च्या इव्हेंटमध्ये पुणे बेस्ड इलेक्ट्रीक व्हेईकल स्टार्टअप कंपनीने व्हेव मोबिलिटी ( Vayve Mobility ) देशाची पहिली सोलर पॉवर कार  ‘Vayve Eva’ ला लाँच केली आहे. तीन मीटर पेक्षाही छोटी या इलेक्ट्रीक कारची किंमत देखील अंत्यत कमी आहे. कंपनीने दावा केला आहे की एका सिंगल चार्जिंवर ही कार २५० किलोमीटरपर्यंत धावू शकते.

८० पैशात १ किलोमीटर धावणार

Vayve EVA च्या सोलर कारच्या डिझाईनमध्ये सोलर पॅनलला सनरुफच्या जागी हे सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. या कारचा एक किलोमीटर चालविण्याचा खर्च केवळ ८० पैसे असणार आहे. ही देशाची पहिली सोलर पॉवर्ड इलेक्ट्रीक कार आहे. याच्या फ्रंटमध्ये सिंगल सीट आणि रियर सीटमध्ये थोडी रुंद सीट दिली आहे. तेथे एक प्रोढ व्यक्ती सोबत एक लहान मुलगा बसू शकतो. याच्या ड्रायव्हींग सीटला सहा प्रकारे एडजस्ट करता येऊ शकते. या शिवाया या कारला पॅनारॉमिक सनरुफ दिलेले आहे. या कारमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील दिला आहे.

एप्पल एड्रॉईड सिस्टीमचा कॅमेरा

या कारमध्ये एसी असून अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सिस्टम दिलेली आहे. त्याची लांबी ३०६० मिमी, रुंदी ११५० मिमी, उंची १५९० मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स १७० मिमी आहे. या कारच्या पुढच्या बाजूला इंडिपेंडेंट कॉइल स्प्रिंग सस्पेंशन आणि मागील बाजूला ड्युअल शॉक सस्पेंशनची सोय करण्यात आली आहे. यात पुढच्या चाकांमध्ये डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकांमध्ये ड्रम ब्रेक दिलेले आहेत. इलेक्ट्रिक पॉवर स्टीअरिंगची सुविधा असलेल्या या कारचा टर्निंग रेडियस ३.९ मीटर आहे. या रियर व्हील ड्राईव्ह कारचा टॉप स्पीड ७० किमी प्रती तास आहे.

45 मिनिटात फुल चार्ज होणार

या कारमध्ये १८ Kwh ची लिथियम – ऑर्यन बॅटरीचा पॅक देण्यात आला आहे. यात लिक्वीज कूल्ड इलेक्ट्रीक मोटरचा वापर केला आहे. १२ kw ची पॉवर आणि ४० Nm टॉर्क जेनरेट करतो. कार सिंगल चार्जिंगमध्ये २५० Km पर्यंतचा ड्रायव्हींगची रेंज देते. यात सोलर पॅनल देण्यात आले आहे त्यात कारच्या सनरुफच्या जागी वापर करु शकतो. यात १ km पर्यंत ड्रायव्हींगचा ८० पैसे खर्च येतो. पाच सेंकदात ही कार ० ते ४० किलोमीटरची प्रति तासाचा वेग पकडते. तर फूल चार्जिंगसाठी या कारला ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. तीन मीटर पेक्षाही छोटी या इलेक्ट्रीक कारची किंमत देखील अंत्यत कमी आहे. कंपनीने दावा केला आहे की एका सिंगल चार्जवर ही कार २५० किलोमीटरपर्यंत धावू शकते.

कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.