AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Brezza 2022: न्यू ब्रँड ‘ब्रेझा’चा हटके लूक पाहिलात का? SUV सेगमेंटमध्ये मारुतीची धमाकेदार एण्ट्री

कंपनीने नवीन ब्रेझाला (Maruti Brezza) आकर्षक एसयुव्हीचा लूक देण्यासाठी याच्या फ्रंटला आणि टेल सेक्शनला पुन्हा डिझाईन केले आहे. तर दुसरीकडे अपकमिंग ब्रेझामध्ये नवीन ग्रिल आणि DRLs बघायला मिळणार आहे.

Maruti Brezza 2022: न्यू ब्रँड 'ब्रेझा'चा हटके लूक पाहिलात का? SUV सेगमेंटमध्ये मारुतीची धमाकेदार एण्ट्री
Maruti Brezza 2022Image Credit source: Maruti Suzuki
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 1:20 PM
Share

मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) सर्वाधिक लोकप्रिय कारपैकी एक म्हणजे ब्रेझा (Brezza) आहे. नुकताच या कारचा नवीन लूक समोर आला आहे. रिपोर्टनुसार, मारुती सुझुकीने आपल्या अपकमिंग ब्रेझा मॉडेलमध्ये अनेक बदल केले आहेत. अपकमिंग ब्रेझा प्रीमिअम लूक (premium look) आणि डिझाईनच्या बाबतीत सध्याचे मॉडेल खूप वेगळे आहे. ब्रेझाचे नवीन मॉडेल जूनमध्ये ग्राहकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीने नवीन ब्रेझाला आकर्षक एसयुव्हीचा लूक देण्यासाठी याच्या फ्रंटला आणि टेल सेक्शनला पुन्हा डिझाईन केले आहे. तर दुसरीकडे अपकमिंग ब्रेझामध्ये नवीन ग्रिल आणि DRLs बघायला मिळणार आहे, असे असले तरी कंपनीने अद्याप या सर्व माहितीला दुजोरा दिलेला नाही.

एसयुव्ही सेगमेंटमध्ये एक पाऊल पुढे

मारुती सुझुकीच्या MPV आणि हॅचबॅक कारची भारतीय बाजारात चांगली पकड आहे. परंतु एसयुव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स, ह्युंडाई आणि किआ सारखी कंपन्यांनी चांगला लिड घेतला आहे. अशात मारुती सुझुकीदेखील भारतात एसयुव्ही बाजारात आपले मार्केट शेअर वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. मारुती सुझुकी ब्रेझाचे नवीन मॉडेल एसयुव्ही सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

रि-डिझाईन झाले ब्रेझाचे मॉडेल

युजर्सना ब्रेझाच्या नवीन मॉडेलच्या बंपरमध्येही मोठे बदल झालेले दिसून येणार आहे. कारच्या बंपर आणि हेडलाईटला एसयुव्ही टच देण्यासाठी त्याला पुन्हा रि-डिझाईन करण्यात आले आहे. अपकमिंग कार ट्‌विन DRLs सोबत बाजारात येणार असून त्यात, टर्न इंडिकेटरदेखील डबल मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवीन ब्रेझा ड्युअल टोन फिनिश 16 अलॉय व्हीलसोबत येणार आहे.

दोन कलर व्हेरिएंट

मारुती सुझुकी ब्रेझाच्या नवीन मॉडेलमधून विटाराचे नाव हटविणार आहे. ब्रेझाचे 2022 माडेल मारुती सुझुकी ब्रेझाच्या नावाने ओळखले जाणार आहे. अपकमिंग ब्रेझा दोन कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यात, रेड विद ब्लॅक रुफ आणि ब्लू विद ब्लॅक रुफ यांचा समावेश असणार आहे. कंपनीने याच्या फ्रंट आणि टेल सेक्शनपासून ते ग्रिलपर्यंत संपूर्ण रि-डिझाईन केले आहे. नवीन ब्रेझाचे इंजिन अर्टिगाच्या नुकतेच लाँच करण्यात आलेल्या अर्टिगासारखे असणार आहे. यात, Progressive Smart Hybrid टेक्नोलॉजीसोबत नॅच्युरली एस्पिरेटेड ड्युअल व्हीव्हीटी आणि ड्युअल जेट 1.5 लीटर पेट्रोज इंजिनची पॉवर मिळणार आहे. अपकमिंग कार सीएनजी व्हेरिएंटसह उपलब्ध होणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?