
Maruti Suzuki Bharat NCAP Crash Test: भारताच्या सर्वात मोठा कार निर्मिती कंपनी Maruti Suzuki ला नेहमीच सुरक्षेच्या मुद्यांवर माघार घ्यावी लागली होती. मारुती कंपनीच्या कार स्वस्त असतात आणि मायलेज देखील चांगला देतात. परंतू आता हे चित्र बदलत आहे. कारण Bharat New Car Assessment Programme ( Bharat NCAP ) च्या क्रॅश टेस्टच्या निकाल पाहून कळतेय की मारुती सुझुकीने सुरक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मारुतीच्या अनेक प्रसिद्ध कारने सेफ्टी रेटींग मिळवले आहेत. याचा अर्थ मारुती आता ग्राहकांना सुरक्षित कार देण्यातही पुढाकार घेतला आहे. चला पाहूयात मारुती सुझुकीच्या टॉप कार आणि त्यांचे Bharat NCAP क्रॅश टेस्ट निकाल काय आहेत ते…
Maruti Suzuki Victoris ही मारुतीची सर्वात सुरक्षित कार म्हणून समोर आली आहे. एडल्ट आणि चाईल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शन दोन्हीत या कारला 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. यात स्टँडर्ड रुपात सहा एअरबॅग, ESP, ABS-EBD आणि ISOFIX सारखे फिचर्सचा समावेश आहे. Victoris ने Maruti च्या लाईनअपमध्ये नवा सुरक्षा मानक तयार केला आहे.
मारुती सुझुकी प्रीमियम एमपीव्ही इन्व्हीक्टोने शानदार परफॉर्म दाखवला आहे. सुरक्षा रेटींगमध्ये या कारने 5-स्टार मिळवले आहे. ही कार Toyota च्या TNGA-C च्या धर्तीवर तयार केली आहे. हीची मजबूत बॉडी, 6 एअरबॅग, एडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेंस फिचर्स आणि क्रॅश सेफ्टी हिला फॅमिली कार सेगमेंटमध्ये चांगला पर्याय बनवते. या कारने 30.43/32 (AOP) आणि 45/49 (COP) स्कोर काढला आहे.
Maruti Suzuki ची सर्वात विक्री होणाऱ्या सेडानपैकी एक असलेल्या Dzire च्या नव्या जनरेशन मॉडलने कमाल केली आहे. Marutiची ही पहिली सेडान कार आहे जिने 5-स्टार Bharat NCAP रेटींग मिळवली आहे. Dzire ने 29.46/32 (AOP) आणि 41.57/49 (COP) स्कोर केलेला आहे. यातड्यूल एअरबॅग, ABS-EBD, सिटबेल्ट प्रिटेंशनर आणि पार्किंग सेंसर सारखे सेफ्टी फिचर्सचा समावेश आहे.
मारुतीची प्रसिद्ध हॅचबॅक कार Baleno मात्र चांगले गुण मिळवू शकलेली नाही. हिला 4-स्टार (एडल्ट) आणि 3-स्टार (चाईल्ड) रेटिंग मिळाली आहे. वरच्या व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅगसह हिचा स्कोर 26.52/32 (AOP), तर बेसिक व्हेरिएंट्समध्ये केवळ दोन एअर बॅग आहेत. त्यात 24.04/32 (AOP) स्कोर केला आहे. चाईल्ड सेफ्टीच्या स्कोर देखील सर्व व्हेरिएंट्समध्ये 34.81/49 च राहिला आहे. Baleno सुरक्षित तर आहे, परंतू तिचा सेफ्टी लेव्हल वरच्या व्हेरिएंट्समध्ये जास्त भरोसेलायक आहे.
एकूण पाहाता Maruti Suzuki आता पहिल्या सारखी केवळ स्वस्तातल्या कार न काढता आता सुरक्षित कारची देखील निर्मिती करत आहे.
Victoris, Invicto आणि Dzire सारख्या मॉडल्सने हे स्पष्ट केले आहे की मारुती कंपनी आता सुरक्षिततेला प्राधान्य देत आहे.