AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Suzuki Recall : मारूती सुझुकीची ही कार वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बतमी, 87 हजार कार केल्या रिकॉल

मारुती सुझुकीने आपली वाहने परत मागवण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही कंपनीने अनेक वेळा रिकॉल केले आहे. 2023 बद्दलच बोलायचे झाले तर, मारुतीने यापूर्वीच तीन वेळा आपली वाहने परत मागवली आहेत.

Maruti Suzuki Recall : मारूती सुझुकीची ही कार वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बतमी, 87 हजार कार केल्या रिकॉल
मारूती कारImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 25, 2023 | 1:18 PM
Share

मुंबई :  देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने आपल्या एसप्रेसो (S-Presso) आणि इको (Eeco) मधील संभाव्य दोषांमुळे 87,000 हून अधिक मॉडेल रिकॉल करण्याची घोषणा केली आहे. बाधित वाहनांना मारुती सुझुकीच्या अधिकृत डीलर वर्कशॉपला भेट द्यावी लागेल आणि दोष आढळल्यास ते दुरुस्त करावे. ज्यासाठी वाहन मालकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.

या भागात असू शकतो संभाव्य दोष

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मारूती सुझुकीने 5 जुलै 2021 ते 15 फेब्रुवारी 2023 दरम्यान बनवलेले काही मॉडेल परत मागवले आहेत. स्टीयरिंग टाय रॉडच्या एका भागामध्ये संभाव्य दोषामुळे मारुतीने 87,599 एसप्रेसो आणि इको यांना रिकॉल केले. बाधित वाहनांना मारुती सुझुकीच्या अधिकृत डीलर वर्कशॉपला भेट द्यावी लागेल जेणेकरून काही कमतरता आढळल्यास ती दुरुस्त करून घेता येणे शक्य होईल. त्यासाठी वाहनधारकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.

या आधीही केले होते रिकॉल

मारुती सुझुकीने आपली वाहने परत मागवण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही कंपनीने अनेक वेळा रिकॉल केले आहे. 2023 बद्दलच बोलायचे झाले तर, मारुतीने यापूर्वीच तीन वेळा आपली वाहने परत मागवली आहेत. जानेवारीत पहिली रिकॉल झाली. त्यानंतर कंपनीने 17,362 वाहनांना कॉल केले, तर दुसरे रिकॉल एप्रिलमध्ये 7,213 वाहनांसाठी जारी केले गेले आणि यावेळी 87,599 वाहनांसाठी तिसरे रिकॉल जारी केले गेले, ही एक मोठी रिकॉल आहे.

का करतात रिकॉल?

ऑटोमोबाईल कंपन्यांच्या कार रिकॉलबद्दल अनेकदा ऐकले जाते, काही काळानंतर वाहानांमध्ये तांत्रीक अडचण आल्याचे लक्षात येते. त्यानंतर कंपनीने आपल्या वाहनांसाठी रिकॉल जारी करून कार मालकांना माहिती देते. जेणेकरुन अखादे मोठे नुकसान किंवा अपघात होण्यापासून वाचता येईल. वाहनांवर आढळणारे हे दोष उत्पादनातील दोषांमुळे असतात. ज्याची तपासणी केल्यानंतर कंपनी त्या काळात उत्पादित केलेल्या सर्व वाहनांसाठी रिकॉल जारी करते. नियमानुसार याचा संपूर्ण खर्च कंपनीला करावा लागतो.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?