
भारतात ५.७९ लाखाच्या सुरुवातीच्या एक्स शोरुम किंमतीला विकली जाणारी मारुती सुझुकी वॅगनआरने मोठा इतिहास रचला आहे. वॅगनआर कारने जगभरात एक कोटी युनिट विक्रीचा आकडा गाठला आहे. वॅगनआर या टप्प्यांवर पोहचणाऱ्या मोजक्या कारपैकी एक आहे. भारतात वॅगनआरला खूपच पसंद केले जात आहे. देशातील बेस्ट सेलिंग कारमध्ये ही कार नेहमीच राहीली आहे.
मारुती वॅगनआर कारला एक कोटी पर्यंतच्या विक्री आकडा गाठण्यासाठी ३१ वर्षे लागली आहे. सुझुकीने सर्वात आधी साल १९९३ मध्ये जपानमध्ये या कारला लाँच केले होते. भारतात या कारला १९९९ साली लाँच केले गेले. हिची खासियत म्हणजे हिचा ‘टॉल-बॉय’ स्टान्स,आतील जादा स्पेस आणि ज्यादा ग्राऊंड क्लिअरन्स आहे. जो भारतात वापरासाठी एक चांगला पर्याय आहे.
एवढंच नाही तर कारची कमी किंमत आणि शानदार मायलेज देखील हिची लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण आहे. भारतात आतापर्यंत वॅगनआरला तीन वेळा अपडेट केले आहे. हीला शेवटचे २०१९ ला अपडेट केले होते. सुझुकी जपान कंपनी भारतासह संपूर्ण आशियात आणि युरोपात वॅगनआर कारला विकतो. या कारला एकूण ७५ देशांत विकले जाते.
वॅगनआरमध्ये १.२ लिटरचे असे इंजिन आहे जे चांगली ताकद आणि उत्तम मायलेज देते. २०१९ मध्ये आलेले हिचे नवे मॉडेल आणखीनच जादा स्पेस देणारे आहे. यात १.० लिटर आणि १.२ लिटर इंजिनाचे पर्याय देखील आहेत. याशिवाय हिचा सीएनजी व्हेरिएंट देखील प्रायव्हेट आणि फ्लीट खरेदीदारात खूपच पसंद केला जात आहे. वॅगनआरची सर्वाधिक विक्री भारतात होते. आणि ही देशाची सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे. गेल्या वर्षी या कारने भारतात तिचे २५ वर्षे पूर्ण केली होती. आणि तोपर्यंत तिची ३.२ दशलक्ष जादा युनिट्स विकले गेले होते.