इलेक्ट्रिक सनरुफ, तीन ट्रान्समिशन पर्यायांसह MG Hector Shine लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

हेक्टरच्या (MG Hector) दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त, एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) आज एमजी हेक्टरचे 'शाईन' व्हेरिअंट लॉन्च केलं आहे.

इलेक्ट्रिक सनरुफ, तीन ट्रान्समिशन पर्यायांसह MG Hector Shine लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
MG Hector Shine
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 4:42 PM

मुंबई : हेक्टरच्या (MG Hector) दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त, एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) आज एमजी हेक्टरचे ‘शाईन’ व्हेरिअंट लॉन्च केलं आहे. पेट्रोल एमटी, डिझेल एमटी आणि पेट्रोल सीव्हीटी पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या हेक्टर शाइनची किंमत 14.51 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) सुरु होते. (MG Hector SUV gets new Shine variant, additional colour and transmission option)

नव्या ट्रिममध्ये सर्वात नवे इलेक्ट्रिक सनरुफ, 17-इंच अलॉय व्हील्स आणि 26.4 सेमी एचडी टचस्क्रीन एव्हीएन सिस्टिम, अ‍ॅपल कार प्लेसह आणि अँड्रॉइड ऑटो या सुविधा आहेत. तसेच शाइन सीव्हीटीमध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, पुश बटण स्टार्ट/स्टॉप आणि स्मार्ट एंट्री, क्रोम डोअर हँडल आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग आदींची सुसज्जता आहे.

एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले, “हेक्टरचा भारतातील दुसरा वर्धापन दिन हे हेक्टरच्या पोर्टफोलिओला आणखी बळकटी देण्यासाठीचे उत्तम निमित्त आहे. शाइन व्हेरिएंटमुळे हेक्टर परिवार श्रेणीची शोभा वाढवते. यात पाच प्रकार असून ग्राहकांना हवे ते व्हेरिएंट निवडण्याची शक्ती प्रदान करते. एमजीच्या कुटुंबात नव्या सदस्याचे स्वागत करण्याची ही एक संधी आहे.”

तसेच, एमजी एक निवडक अ‍ॅक्सेसरीजचे पॅकेजदेखील प्रदान करत आहे, यात उच्च सौंदर्यात्मक आणि कार्यक्षम मूल्य असलेल्या गोष्टी असतील. जसे की, लेदरेट सीट कव्हर्स आणि स्टीअरिंग व्हील कव्हर, विंडो सनशेड्स, एअर प्युरिफायर, वायरलेस फोन चार्जिंग आणि थ्री डी केबिन मॅट्स आकर्षक किंमतीच्या ऑफरवर असतील. या कारला एमजी शील्ड इन्शुरन्सदेखील असेल. याअंतर्गत 5-5-5 ऑफर तसेच पाच वर्षांची अमर्याद किलोमीटरची वॉरंटी, पाच वर्षांसाठी रोडसाइड असिस्टन्स आणि पाच वर्षांची लेबर फ्री सर्व्हिस यांचा समावेश आहे.

कशी आहे Mg Hector?

एमजी या कंपनीने भारतीय मार्केटमध्ये 2019 ला दमदार इंट्री केली होती. यावेळी कंपनीने Hector ही एसयूव्ही लाँच केली होती. त्यानंतर कंपनीने एकापेक्षा एक चांगल्या गाड्या मार्केटमध्ये लाँच केल्या होत्या. Hector एसयूव्हीची किंमत 12.89 लाखापासून सुरु होत आहे. विविध फिचर्स असल्याने सध्या या गाडीची मार्केटमध्ये चांगलीच चर्चा आहे. मिड साइज एसयूव्ही एमजी हेक्टरला सध्या भारतीय बाजारात चांगली पसंती मिळत आहे. सध्या भारतात MG च्या MG Hector, MG ZS EV, MG Hector Plus 6 Seater आणि MG Gloster या कार उपलब्ध आहेत.

कंपनीने नवीन CVT गियरबॉक्स सध्याच्या पेट्रोल इंजिनसोबत जोडलं आहे. यापूर्वी एमजी हेक्टर पेट्रोल वेरियंट डुअल-क्लच ट्रान्समिशनसह (DCT) सादर करण्यात आलं होतं. नवीन CVT युनिट 2021 एमजी हेक्टरमध्ये 1.5-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत जोडलं आहे. हे इंजिन 141 बीएचपी आणि 250 एनएम टार्क जनरेट करतं. सध्या हे 6-स्पीड मॅनुअल आणि डीसीटी गियरबॉक्ससह दिलं जातं.

इतर बातम्या

MG मोटर इंडियाची 7 सीटर Gloster बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Mahindra Bolero Neo ला भारतीयांची पसंती, एका महिन्याहून कमी कालावधीत 5500 बुकिंग्स

गडकरींच्या ‘सिक्सर’वर कार कंपन्या काय करणार? एअरबॅगनं तुमची कार, ड्रायव्हिंग किती बदलणार?

(MG Hector SUV gets new Shine variant, additional colour and transmission option)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.