केंद्र सरकार 4 कोटी वाहनांवर ग्रीन टॅक्स लावणार, तुमच्या वाहनावर कर लागणार का?

Yuvraj Jadhav

|

Updated on: Mar 28, 2021 | 7:09 PM

भारतात सध्या 15 वर्षाहून अधिक जुन्या वाहनांची संख्या 4 कोटी आहे. Ministry Road Transport green tax

केंद्र सरकार 4 कोटी वाहनांवर ग्रीन टॅक्स लावणार, तुमच्या वाहनावर कर लागणार का?
लाखो वाहनांनी चुकवला कोट्यवधींचा कर

नवी दिल्ली: भारतात सध्या 15 वर्षाहून अधिक जुन्या वाहनांची संख्या 4 कोटी आहे. ही वाहनं प्रदूषणामध्ये वाढ होण्यासाठी कारणीभूत आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालय त्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा विचार करत आहे. 15 वर्षांहून अधिक जुनी वाहनं कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त आहेत. तर दुसऱ्या स्थनावार उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या स्थानावर दिल्लीचा नंबर लागतो.केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानं याबाबत एक माहिती जाहीर केली आहे. त्या माहितीनुसार देशात सर्वाधिक जुनी वाहनं कर्नाटकमध्ये आहेत. तर आंध्र प्रदेश, तेलंगाणा, मध्य प्रदेश आणि लक्षद्वीपची माहिती त्यामध्ये उपलब्ध नाही. कारणं त्या राज्यांकडे माहिती उपलब्ध नाही. (Ministry of Road Transport and Highways will impose green tax on four crore old vehicle )

2 कोटी वाहनं 20 वर्षापेंक्षा अधिक जुनी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार 4 कोटीमधील 2 कोटी वाहनं 20 वर्षांहून अधिक जुनी आहेत. त्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारांना पाठवण्यात आला आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक जुनी वाहनं कर्नाटकमध्ये असून त्याची संख्या 70 लाख आहे.

उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही सर्वाधिक जुनी वाहनं

कर्नाटक पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये 56.54 लाख जुनी वाहनं आहेत त्यापैकी 24.55 लाख वाहनं 20 वर्षांपेक्षा अधिक जुनी आहेत. नवी दिल्लीमध्ये 49.93 लाख जुनी वाहनं आहेत त्यापैकी 35 .11 लाख वाहनं जुनीह आहेत. त्यापाठोपाठ केरळमध्ये 34.64 लाख, पंजाबमध्ये 25.38 लाख, तामिळनाडूमध्ये 33.43 लाख, पश्चिम बंगालमध्ये 22.69 लाख जुनी वाहनं आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, राजस्थान आणि हरियाणामध्ये अशा वाहनांची संख्या 12 ते लाखांच्या दरम्यान आहे.

उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, पुद्दुचेरी, आसाम, बिहार, गोवा, त्रिपुरा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली आणि दमण दीव मध्ये जुन्या वाहनांची संख्या 1 लाख ते 5.44 लाखांच्या दरम्यान आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा राज्यांना प्रस्ताव

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारांना पाठवला आहे. राज्य सरकार त्यावर विचार करुन तो प्रस्ताव केंद्राकडे परत पाठवतील. त्यानंतर ग्रीन टॅक्स लावण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

संबंधित बातम्या:

अरे देवा! कंगना वडिलांबाबत हे काय बोलली?; चाहते म्हणाले, थू तुझ्यावर!

Special Report: महाराष्ट्रावर लॉकडॉऊनचे ढग? चांद्यापासून ते बांद्यापर्यंत 15 शहरं अ‍ॅलर्टवर; वाचा सविस्तर!

(Ministry of Road Transport and Highways will impose green tax on four crore old vehicle )

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI