अरे देवा! कंगना वडिलांबाबत हे काय बोलली?; चाहते म्हणाले, थू तुझ्यावर!

कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच टार्गेट होते आहे.

अरे देवा! कंगना वडिलांबाबत हे काय बोलली?; चाहते म्हणाले, थू तुझ्यावर!

मुंबई : कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच टार्गेट असते. आता कंगनाने अशाच प्रकारचे एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. त्यामध्ये कंगनाने तिचे आणि वडिलांचे नाते कसे होते याबद्दल सांगितले आहे हे सांगताना कंगनाने एक वादग्रस्त विधान केले आहे आणि त्यानंतरच तिला आता ट्रोल केलं जात आहे.  (Kangana Ranaut is being trolled on social media)

पहिल्या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले आहे की, माझ्या वडिलांकडे रायफल आणि बंदूक होती, मी लहान असताना त्यांनी मला रागावले की, माझे पाय थरथर कापायचे माझ्या वडिलांची ओळख गुंड म्हणून होती. मी वयाच्या 15 व्या वर्षी त्यांच्यासोबत भांडणे केली होती आणि मी 15 व्या वर्षी माझे घर सोडले होते. दुसर्‍या ट्विटमध्ये कंगना लिहिली आहे की, या चिल्लर इंडस्ट्रीचा लोकांना असे वाटते की, मला मिळालेले यश माझ्या डोक्यात गेले आहे. पण मी नेहमीच वाघ होते, फक्त माझ्या यशामुळे माझा आवाज बुलंद झाला आहे.

आज मी देशाचा सर्वात मोठा महत्वाचा आवाज आहे. इतिहास हा साक्षीदार आहे ज्याने मला सुधारण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना मीच सुधारले आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये कंगनाने वडिलांच्या फोटो शेअर करत लिहिले आहे की, माझ्या वडिलांना मला सर्वोत्कृष्ट डॉक्टर बनवायचे होते. जेव्हा मी शाळेत जाण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी मला चापट मारण्याचा प्रयत्न केला,

मी त्यांचा हात धरला आणि म्हणाले की, जर तुम्ही मला मारहाण केली तर मीसुद्धा तुम्हाला मारेल…त्यावेळी माझ्या वडिलांनी फक्त मला पाहिले आणि माझ्या आईला पाहिले आणि निघून रूममध्ये गेले. त्यानंतर मी कधीच त्यांच्याजवळ जाऊ शकले नाही. मी कायमची त्यांच्यापासून दूर गेले. यातून मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, बेडिया तोडण्यासाठी मी कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकते. मला कोणीही बांधून ठेऊ शकत नाही.

संबंधित बातम्या : 

Video : अंकिता लोखंडेचा आणखी एक डान्स व्हिडीओ व्हायरल; सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल

रणवीर सिंहच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ’83’ चित्रपट या तारखेला रिलीज होणार!

श्वेता तिवारीविरोधात पती अभिनवची कोर्टात धाव, मुलाला भेटू न देण्याचा आरोप!

(Kangana Ranaut is being trolled on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI