श्वेता तिवारीविरोधात पती अभिनवची कोर्टात धाव, मुलाला भेटू न देण्याचा आरोप!

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते.

श्वेता तिवारीविरोधात पती अभिनवची कोर्टात धाव, मुलाला भेटू न देण्याचा आरोप!

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. विशेषत: विवाहित जीवनाशी तिच्या अनेक गोष्टी समोर येत असतात. श्वेता तिवारीचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. त्या दोघांची एक मुलगी देखील आहे तिचे नाव पलक असे आहे. (Husband Abhinav Kohli files suit against Shweta Tiwari in High Court)

2007 मध्ये राजा चौधरीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने अभिनव कोहलीसोबत लग्न केले आणि त्यांचा एक मुलगा देखील आहे. श्वेता तिवारीने अभिनव कोहली विरोधात गंभीर आरोप केले होते. तिचे म्हणणे आहे की, अभिनव कोहलीने तिला आणि माझ्या मुलीला ही मारहाण केली होती. आता अभिनवने श्वेतावर आरोप केला आहे की, ती आपल्याला 4 वर्षाच्या मुलाला भेटू देत नाही आणि यावेळी त्याचा मुलगा नेमका कुठे आहे याची माहिती देखील नाहीये.

अभिनवने मुलगा रेयांशचा ताब्यात घेण्यासाठी डिसेंबर 2020 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकेत अभिनवनेही श्वेतावर आपला मुलगा रेयांशला भेटू न दिल्याचा आरोप केला आहे. अभिनवची वकील तृप्ती शेट्टी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत अभिनवबद्दल सांगितले आहे. तृप्ती शेट्टी बोलताना म्हणाल्या की, डिसेंबर 2020 मध्ये माझ्या क्लायंटने श्वेताविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

अभिनवला मुलगा रेयांशला भेटण्याची परवानगी दिली जात नाही. गेल्या वर्षी श्वेता तिवारी कोरोना पॉझिटिव्ह झाली तेव्हा अभिनवने रेयांशची पूर्ण काळजी घेतली होती आणि आता अभिनवला हे सुध्दा माहिती नाही की, त्याचा मुलगा सध्या कुठे आहे. अभिनवने बऱ्याचवेळा रियांशला भेटण्यासाठी संपर्क केल्या मात्र, तो होऊ शकला नाही रियांशला भेटण्यासाठी त्याने पोलिसांची देखील मदत घेतली त्याचाही काही उपयोग झाला नाही.

संबंधित बातम्या : 

अक्षयची ‘बेल बॉटम’ दहशतवादी घटनेवर आधारीत; वाचा चित्रपटाची कहाणी! 

VIDEO | विनामास्क-विनाहेल्मेट बाईक राईड, विवेक ओबेरॉयला ‘मस्ती’ नडली, मुंबई पोलिसांची कारवाई

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईन : रामदास आठवले

(Husband Abhinav Kohli files suit against Shweta Tiwari in High Court)

Published On - 9:56 am, Sat, 20 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI