VIDEO | विनामास्क-विनाहेल्मेट बाईक राईड, विवेक ओबेरॉयला ‘मस्ती’ नडली, मुंबई पोलिसांची कारवाई

'व्हॅलेंटाइन डे'ला विवेक ओबेरॉयने बाईकवरुन पत्नीसोबत सैर केली होती. (Vivek Oberoi Bike Without Helmet)

VIDEO | विनामास्क-विनाहेल्मेट बाईक राईड, विवेक ओबेरॉयला 'मस्ती' नडली, मुंबई पोलिसांची कारवाई
अभिनेता विवेक ओबेरॉय

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याला दंड ठोठावण्यात आला आहे. विनाहेल्मेट आणि विनामास्क बाईक चालवल्याने विवेकवर कारवाई करण्यात आली. विवेकला 500 रुपयांचे ई-चलान पाठवण्यात आले आहे. तर मुंबईतील जुहू पोलीसात विवेक ऑबेरायवर गुन्हा नोंदवल्याचीही माहिती आहे. (Actor Vivek Oberoi Fine For Riding Bike Without Helmet by Mumbai Police)

‘व्हॅलेंटाइन डे’ला विवेक ओबेरॉयने बाईकवरुन पत्नीसोबत सैर केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात विवेकने हेल्मेट घातलेले नव्हते, तसेच चेहऱ्याला मास्कही लावला नव्हता. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

नेमकं काय घडलं?

विवेक ओबेरॉयने बाईक राईडचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्याखाली त्याने कॅप्शनही दिलं होतं. ‘व्हॅलेंटाइन डेची मस्त सुरुवात… मी, माझी बायको आणि ती… रिफ्रेश करणारी जॉयराईड’ अशा आशयाचं कॅप्शन विवेकने दिलं होतं.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

सामाजिक कार्यकर्त्यांची गृहमंत्र्यांकडे तक्रार

विवेकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले. विवेकने हेल्मेटविना बाईक चालवून वाहतूक सुरक्षा नियम मोडला आहे. तसेच मास्क न घातल्याने तोही नियमभंग ठरतो. युवा पिढीसमोर चुकीचा संदेश जात असल्याचं वर्गीस यांनी लिहिलं होतं.

वर्गीस यांच्या या ट्वीटची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली. त्यानंतर विवेकवर गुन्हा दाखल करण्यात आला. विवेकला 500 रुपयांचं चलानही मोबाईलवर पाठवण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

सँडल वुड ड्रग्जप्रकरणी मोठी कारवाई, विवेक ओबेरॉयच्या मेहुण्याला अटक

(Actor Vivek Oberoi Fine For Riding Bike Without Helmet by Mumbai Police)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI