AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात लाँच झाली 4.99 कोटींची ही कार, जाणून घ्या या कारमध्ये काय आहे खास

या वाहनात V10 नैसर्गिकरीत्या-एस्पिरेटेड इंजिन दिले गेले आहे, जे 640hp पॉवर देते आणि यात 565 Nm टॉर्क आहे. Huracan STO वेगवान कार आहे.

भारतात लाँच झाली 4.99 कोटींची ही कार, जाणून घ्या या कारमध्ये काय आहे खास
भारतात लाँच झाली 4.99 कोटींची ही कार
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 16, 2021 | 5:17 PM
Share

नवी दिल्ली : लॅम्बोर्गिनीने भारतात बीस्ट हुरकन STO कार 4.99 कोटी रुपये किंमतीत लाँच केली आहे. ही सुपर स्पोर्ट्स कार सुपर ट्रॉफिओ इव्हो रेस कारची रोड-होमोलॉगेटेड आवृत्ती आहे. एसटीओ(STO) म्हणजे सुपर ट्रोफिओ ओमोलोगोटो. या वाहनात V10 नैसर्गिकरीत्या-एस्पिरेटेड इंजिन दिले गेले आहे, जे 640hp पॉवर देते आणि यात 565 Nm टॉर्क आहे. Huracan STO वेगवान कार आहे. तीन सेकंदात 100 किमी प्रतितास आणि नऊ सेकंदात 200 किमी प्रतिताससह, स्पोर्ट्स कारचा अव्वल वेग 310 किमी प्रतितास आहे. हलके वजन आणि एरोडायनामिकमुळे लॅम्बोर्गिनी खूप वेगवान आहे. (New 4.99 crore car launched in India, know what is special about this car)

गाडीच्या पुढच्या बम्परसमोर नवीन एअर डक्ट्स देण्यात आले आहेत, जे एयरफ्लो वाढवते आणि कमी वेळेत इंजिनला थंड होण्यास मदत होते. हुरकन एसटीओमध्ये भरपूर कार्बन फायबर वापरण्यात आले आहे. बाह्य पॅनेलवर एकूण 75 टक्के कार्बन फायबर स्थापित आहे.

कारची वैशिष्ट्ये

एसटीओची विंडस्क्रीन 20 टक्के हलके आहे आणि यामुळे वाहनाच्या कामगिरीत भर पाडते. V10 इंजिनचा उपयोग गाडीला स्पोर्टी आणि रेसिंगसाठी बनवण्यासाठी करण्यात आला आहे. गाडीमध्ये आपल्याला एसटीओ(STO), ट्रोफिओ(Trofeo) आणि पिओगिया(Pioggia) असे तीन ड्राइव्ह मोड देखील मिळतात. पहिला मोड सामान्य रस्ता स्थितीसाठी, दुसरा वेगवान लॅप टाइम ट्रॅक आणि तिसरा ट्रॅक्शन कंट्रोल, टॉर्क विक्टोरिंग यासाठी आहे. जर आपण वाहनाच्या कामगिरीबद्दल बोललो तर ते फक्त 3 सेकंदात 0 ते 100 ची गती तर 9 सेकंदात 0 ते 200 ची गती पकडते. कारचा टॉप स्पीड 310 किमी प्रतितास आहे.

गाडीच्या इंटीरियरमध्ये कार्बन फायबरचा वापर

गाडीमध्ये CCM-R ब्रेक्स आहेत जे F1 अॅप्लीकेशनने घेतले आहेत. कॉकपिटपर्यंत गाडीच्या इंटीरियरमध्ये कार्बन फायबरचा वापर केला गेला आहे. यात आपल्याला स्पोर्ट्स सीट्स, अलकंटारा इंटीरियर मिळते. गाडीमध्ये कार्पेट्सला डोरमॅट्सने रिप्लेस केले आहे, ज्यात कार्बन फायबर वापरला गेला आहे. तसेच गाडीच्या दरवाजांमध्ये देखील फायबर लावले आहेत. तसेच आपल्याला एक रोलबार देखील मिळेल जो फोर पॉईंट सीटबेल्ट आणि नवीन डिझाइनमध्ये फ्रंट ट्रंक हेल्मेट स्टोरेजसह येते.

गाडीचे मुख्य टचस्क्रीन युनिट कारचे कार्य व्यवस्थापित करते. येथे आपल्याला ड्राईव्ह मोड इंडिकेटर, LDVI सिस्टम आणि टायर प्रेशरबद्दल माहिती मिळेल. त्याचबरोबर ब्रेक तापमानाची माहितीही यात उपलब्ध आहे. कार मालक इंटीरियर आणि एक्सटीयिर पूर्णपणे पर्सनलाईज करू शकता. (New 4.99 crore car launched in India, know what is special about this car)

इतर बातम्या

ज्यांना भीती वाटते त्यांनी खुशाल जावे; काँग्रेस सोडून जाणारे संघाचे होते: राहुल गांधी

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या DA वाढीनंतर पगार किती होणार आणि PF चे पैसे किती मिळणार? 10 मुद्यांमध्ये समजून घ्या

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?