AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bajaj Pulsar चं नवं मॉडेल 24 ऑगस्टला होणार लाँच, डिझाइनपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

बजाज ऑटो 24 ऑगस्ट 2026 रोजी भारतात नवीन जनरेशनची पल्सरचे हे दोन मॉडेल लाँच करणार आहे. या बाईक्सच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळतील. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

Bajaj Pulsar चं नवं मॉडेल 24 ऑगस्टला होणार लाँच, डिझाइनपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
Bajaj Pulsar new model 2026
| Edited By: | Updated on: Aug 30, 2026 | 3:31 PM
Share

बजाज ऑटो कंपनी त्यांच्या लोकप्रिय पल्सर सिरीजमध्ये मोठा बदल करत धमाकेदार एँट्री घेण्याच्या तयारीत आहेत. कंपनी 24 ऑगस्ट 2026 रोजी भारतात नवीन जनरेशनची बजाज पल्सर 125 आणि पल्सर 150 बाईक्स लाँच करणार आहे. दोन्ही बाईक्समध्ये केवळ बाह्य स्वरूपातच नव्हे, तर प्लॅटफॉर्म, चेसिस, इंजिन आणि तंत्रज्ञानामध्येही महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार नवीन पल्सर 125 आणि पल्सर 150 चे युनिट्स डीलरशिप्समध्ये येऊ लागले आहेत. यामुळे त्यांच्या लाँचपूर्वीच या बाईक्सबद्दल काही माहिती समोर आली आहे. पहिल्या नजरेत त्यांचे डिझाइन मागील पल्सरसारखेच दिसते, परंतु कंपनीने या बाईक्सना अधिक आकर्षक आणि आधुनिक बनवले आहे. नवीन बाईक्समध्ये मोठे हेडलॅम्प कव्हर, अधिक दणकट फ्युएल टँक आणि अधिक स्लिम टेल सेक्शन आहे. याचा अर्थ कंपनीने मूळ पल्सरचे डिझाइन कायम ठेवून फक्‍त आजच्या जनरेशननुसार अपडेट केले आहेत.

नवीन प्लॅटफॉर्म आणि चेसिस

नवीन पल्सर 125 आणि पल्सर 150 मधील सर्वात मोठे बदल बाईक्सच्या आत पाहायला मिळणार आहेत. दोन्ही मोटरसायकल नवीन प्लॅटफॉर्मवर बनवल्या आहेत आणि त्यात नवीन फ्रेम आहे. सस्पेंशनमध्ये समोर टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे मोनोशॉक असण्याची शक्यता आहे. ब्रेकिंगमध्ये समोर डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक असण्याची शक्यता आहे. दोन्ही बाईक्समध्ये सिंगल-चॅनल एबीएस असण्याची शक्यता आहे. तथापि व्हेरिएंटनुसार काही वैशिष्ट्ये बदलू शकतात.

नवीन इंजिन उपलब्ध असू शकतात

बजाज दोन्ही बाईक्समध्ये नवीन इंजिन बसवण्याची तयारी करत आहे. तथापि, कंपनीने अद्याप इंजिनची संपूर्ण पॉवर आणि टॉर्कची आकडेवारी जाहीर केलेली नाही. पल्सर 150 मध्ये ऑइल-कूलिंग सिस्टीम असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लांबच्या प्रवासादरम्यान इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. इंजिनची क्षमता, पॉवर, टॉर्क आणि गिअरबॉक्सच्या वैशिष्ट्यांविषयी तपशील लाँचच्या वेळी जाहीर केल्या जाणार आहेत.

बाईक्सच्या टेक्नॉलॉजीमध्येही मोठे अपग्रेड

नवीन पल्सर 125 आणि पल्सर 150 मध्येही सुधारित फीचर्स असण्याची शक्यता आहे. टॉप व्हेरियंट्समध्ये कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नॅव्हिगेशन यांसारखी फीचर्स असण्याची अपेक्षा आहे. जर ही फीचर्स उपलब्ध असतील, तर नवीन पल्सर पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम वाटेल आणि आपल्या सेगमेंटमधील इतर आधुनिक बाईक्सना टक्कर देऊ शकेल.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती