AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MG Windsor Pro EV लॉन्च, नेक्सॉन, क्रेटा ईव्हीला टक्कर देणार? जाणून घ्या

तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा. टाटा नेक्सॉन ईव्ही आणि ह्युंदाई क्रेटा ईव्हीला टक्कर देणारी एक कार मंगळवारी भारतात लाँच करण्यात आली. अवघ्या 12.50 लाख रुपयांपासून सुरू होणारी ही कार सिंगल चार्जमध्ये 449 किलोमीटरची रेंज देईल. चला तर मग जाणून घेऊया.

MG Windsor Pro EV लॉन्च, नेक्सॉन, क्रेटा ईव्हीला टक्कर देणार? जाणून घ्या
नवीन कार दम दाखवणार?Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: May 09, 2025 | 3:27 PM

तुम्हाला कार खरेदी करायची आहे का? टाटा नेक्सॉन ईव्ही, ह्युंदाई क्रेटा ईव्हीला टक्कर देणारी कार बाजारात आली आहे. सिंगल चार्जमध्ये 449 किलोमीटरची रेंज मिळेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेली एडिशन सिंगल चार्जमध्ये 332 किमीची रेंज देते. विशेष म्हणजे ट्रॅफिक जॅम असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि अ‍ॅडेप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स मिळणार आहेत. ही कार तीन नव्या रंगांमध्ये येणार आहे. अरोरा सिल्व्हर, ग्लेझ रेड आणि सेलाडॉन ब्लू असे हे रंग आहेत.

इलेक्ट्रिक कारच्या दुनियेत एक गाडी नवीन दिमाखात आली आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही आणि ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकला टक्कर देणारी एमजी विंडसर प्रो ईव्ही मंगळवारी लाँच करण्यात आली. ही कार वाढीव रेंजसह येते आणि सिंगल चार्जमध्ये 449 किमीपर्यंतचे अंतर पार करते. याची सुरुवातीची किंमत फक्त 12.50 लाख रुपये आहे. याचे बुकिंग 8 मेपासून सुरू होत आहे.

एमजी विंडसर प्रो फिक्स्ड बॅटरी आणि रेंटल बॅटरीपर्यायांसह येईल. जर ग्राहकांनी फिक्स्ड बॅटरीने खरेदी केली तर त्यांना ही कार 17.79 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत मिळेल. तर भाड्यासाठी प्रति किलोमीटर साडेचार रुपये मोजावे लागतात. ही कारची सुरुवातीची किंमत आहे, ज्याचा फायदा 8,000 ग्राहकांना होणार आहे. कारची ही किंमत ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक आणि टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्सच्या आसपास आहे.

हे सुद्धा वाचा

52.9 किलोवॅट बॅटरी

एमजी विंडसर प्रो ईव्हीमध्ये 52.9 किलोवॅट बॅटरी पॅक मिळेल. सिंगल चार्जमध्ये 449 किलोमीटरची रेंज मिळेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेली सोपी एडिशन सिंगल चार्जमध्ये 332 किमीची रेंज देते.

सुरक्षितता आणि आराम

या कारला कंपनीकडून लेव्हल-2 एडीएएस देखील देण्यात आला आहे. यामुळे कारची ऑटोमेशन क्षमता आणि सुरक्षितता वाढते. याशिवाय ट्रॅफिक जॅम असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि अ‍ॅडेप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स मिळणार आहेत.

या कारसोबत तुम्ही दुसरी इलेक्ट्रिक कार आणि इतर इलेक्ट्रिक डिव्हाइसही चालवू शकता. ही कार तीन नव्या रंगांमध्ये येणार आहे. अरोरा सिल्व्हर, ग्लेझ रेड आणि सेलाडॉन ब्लू असे हे रंग आहेत.

एमजी विंडसर ही देशातील सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिक कार आहे. याचे साधे व्हर्जन सुमारे 8 महिन्यांनी लाँच करण्यात आले होते. 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची ही कार कंपनीने या कारसोबत ‘बॅटरी एज अ सर्व्हिस’ (रेंटल बॅटरी) हा पर्याय सादर केला, ज्यामुळे ही कार अनेक महिने देशातील नंबर-1 इलेक्ट्रिक कार राहिली.

सुनांना मारझोड करणाऱ्या हगवणेंचा उद्योग समोर, बैलासमोर नाचवलं गौतमीला
सुनांना मारझोड करणाऱ्या हगवणेंचा उद्योग समोर, बैलासमोर नाचवलं गौतमीला.
अजित पवारांच्या वक्तव्यानं हशा अन् प्रश्न विचारताच दादा मिडीयावर भडकले
अजित पवारांच्या वक्तव्यानं हशा अन् प्रश्न विचारताच दादा मिडीयावर भडकले.
वन खात्यात बदल्यांसाठी तब्बल 35 लाख? ऑडिओ क्लिपनंतर खळबळ
वन खात्यात बदल्यांसाठी तब्बल 35 लाख? ऑडिओ क्लिपनंतर खळबळ.
सूनेची आत्महत्या हगवणेचा मटणावर ताण, वैष्णवीचा मृतदेह पाहून सासरा फरार
सूनेची आत्महत्या हगवणेचा मटणावर ताण, वैष्णवीचा मृतदेह पाहून सासरा फरार.
अजित पवार कसपटे कुटुंबाच्या भेटीसाठी दाखल
अजित पवार कसपटे कुटुंबाच्या भेटीसाठी दाखल.
शेतकऱ्यांना खुशखबर! तुरीच्या हमीभाव खरेदीला मिळाली मुदतवाढ
शेतकऱ्यांना खुशखबर! तुरीच्या हमीभाव खरेदीला मिळाली मुदतवाढ.
नागपुरात ईडीकडून 2 ठिकाणी छापेमारी; काय आहे प्रकरण?
नागपुरात ईडीकडून 2 ठिकाणी छापेमारी; काय आहे प्रकरण?.
शशांकने वैष्णवीला केली होती पाईपने अमानुष मारहाण
शशांकने वैष्णवीला केली होती पाईपने अमानुष मारहाण.
हगवणे पितापुत्राला पोलीस कोठडी, कोर्टात काय घडलं?
हगवणे पितापुत्राला पोलीस कोठडी, कोर्टात काय घडलं?.
मंत्री छगन भुजबळांचं शिवभोजन थाळीवर मोठं विधान
मंत्री छगन भुजबळांचं शिवभोजन थाळीवर मोठं विधान.