AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 लाखांहून स्वस्त SUV ची भारतात मोठी क्रेझ, वर्षभरात 30000 युनिट्सची विक्री

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे चारचाकी वाहनांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे. निसान मोटर्सची वाहने सध्या भारतीय बाजारपेठेत ग्राहकांची अधिक पसंती मिळवत आहेत.

6 लाखांहून स्वस्त SUV ची भारतात मोठी क्रेझ, वर्षभरात 30000 युनिट्सची विक्री
Nissan Magnite
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 6:00 AM
Share

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे चारचाकी वाहनांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे. निसान मोटर्सची वाहने सध्या भारतीय बाजारपेठेत ग्राहकांची अधिक पसंती मिळवत आहेत. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या कंपनीच्या एसयूव्हीची बाजारात प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. लॉन्च झाल्यापासून या कारच्या 30,000 हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. (Nissan Magnite Records 30000 units sale in 11 months)

जपानची लोकप्रिय कार निर्माता कंपनी निसान मोटर्सच्या म्हणण्यानुसार, कंपनीने आतापर्यंत त्यांच्या निसान मॅग्नाइटचे 30,000 युनिट्स भारतीय बाजारात वितरित केले आहेत. कंपनीने ही सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च केली होती. लॉन्च झाल्यानंतर या कारची भारतीय बाजारपेठेत बरीच क्रेझ होती. याशिवाय, कोरोनानंतर जेव्हा परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येवू लागल्यानंतर या कारच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. लॉन्च झाल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत कंपनीला Nissan Magnite च्या एकूण 72,000 युनिट्ससाठी बुकिंग्स मिळाल्या आहेत.

कशी आहे मॅग्नाईट?

कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 4 लाख 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.

निसान मॅग्नाईटच्या सर्व (10) व्हेरियंट्सच्या किंमती

  • Magnite XE – 5.59 लाख रुपये
  • Magnite XL – 6.32 लाख रुपये
  • Magnite XV – 6.99 लाख रुपये
  • Magnite XV Premium – 7.68 लाख रुपये
  • Magnite Turbo XL – 7.49 लाख रुपये
  • Magnite Turbo XV – 8.09 लाख रुपये
  • Magnite Turbo XV Premium – 8.89 लाख रुपये
  • Magnite Turbo XL CVT – 8.39 लाख रुपये
  • Magnite Turbo XV CVT – 9.02 लाख रुपये
  • Magnite Turbo XV Premium CVT – 9.74 लाख रुपये

दोन इंजिनांचा पर्याय

Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.

या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.

Nissan Magnite मधील इतर खास फिचर्स

  • Nissan Magnite मध्ये Bi Projector LED हेडलँम्प्स देण्यात आले आहेत.
  • LED DRL, LED इंडिकेटर
  • 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स
  • व्हाइस रेकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

Bharat Vehicle Series: अशी करा मार्क BH मालिकेसाठी नवीन नोंदणी, 15 राज्यांमध्ये सेवा सुरू

15 नव्या इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल, जाणून घ्या बसमध्ये काय आहे खास?

डुकाटीची Panigale V4 SP मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Nissan Magnite Records 30000 units sale in 11 months)

निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.