Tyres : आता साधारण टायर नाही… ‘या’ दोन मोठ्या कंपन्यांनी तयार केले स्मार्ट टायर…

जेके टायर्सनं 29 जुलैला इलेक्ट्रिक व्हीकलसाठी स्मार्ट रेडियल टायर्स रेंज सादर केली आहे. दिग्गज टायर निर्माता कंपनी अपोलो टायर्सनं 27 जुलैला ईव्ही स्पेसिफिक टायरची रेंज लाँच करण्याची घोषणा केलीय.

Tyres : आता साधारण टायर नाही... ‘या’ दोन मोठ्या कंपन्यांनी तयार केले स्मार्ट टायर...
Apollo tyres
Image Credit source: tv9
शुभम कुलकर्णी

|

Aug 01, 2022 | 10:49 AM

नवी दिल्ली : वाढत्या इंधनाच्या किमतींमुळे गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicle) प्रचंड मागणी वाढली आहे. अशात बाजारात दिवसेंदिवस नवीन इलेक्ट्रिक कार तसेच ई-बाईक लाँच करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक व्हेकलच्या मागणीत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या लोकप्रियतेने ईव्हीसाठी वापरल्या जाणार्या जोड साधणांच्या मॅन्यूफॅक्चर्ससाठीही (Manufactures) मोठे आव्हान निर्माण झाले आहे. टायर्सबाबत बोलायचे झाल्यास, देशातील दोन मोठ्या टायर कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास टायरचा पुरवठा करण्यासाठी पुढे आल्या आहेत. जेके टायर्स आणि अपोलो टायर्सने (Apollo tyres) नुकतेच ईव्ही स्पेसिफिक टायर समोर आणलंय. या लेखातून टायर्सची खास बाब बघणार आहोत. यामुळे तुम्हाला या टायर्सची अधिक माहिती मिळू शकेल आणि फायदाही होईल.

का आहे खास टायरची गरज?

इलेक्ट्रिक व्हेकलसाठी तयार करण्यात आलेले स्पेशल टायर्सची रेंज चांगली ठरण्याची आशा आहे. टीओआईच्या रिपोर्टनुसार, नवीन ईव्ही स्पेसिफिक टायर इलेक्ट्रिक व्हीकलची रेंज अधिक चांगली करण्यासाठी मदत करीत असतात. असे असले तरी, यामुळे ईव्हीवर जास्त दबाव पडायला नको. ईव्हीमध्ये भरभक्कम बॅटरी पॅकचे वजन असते. त्यामुळे टायरची साइड वाल मजबूत असणे आवश्‍यक असते. या सर्व खुबी ईव्ही स्पेसिफिक टायर्समध्ये मिळते.

जेके टायर्सचे स्मार्ट डायल टायर्स

प्रमुख टायर निर्माता असलेले जेके टायर्सने 29 जुलैला इलेक्ट्रिक व्हीकलसाठी स्मार्ट रेडियल टायर्स रेंज सादर केली आहे. याचे वैशिष्ट्ये म्हणजे जेके टायर्सने ईव्हीच्या सर्वच कॅटेगिरीसाठी टायर सादर केले आहेत. या रेंजमध्ये इलेक्ट्रिक कारपासून बस, ट्रक आणि हलके कमर्शिअल व्हीकलचाही समावेश होतो. जेके टायर्सनुसार, स्मार्ट रेडियल टायर्स रेंजच्या ट्रेड पॅटर्नला एफईए सिमुलेशन टेक्नॉलॉजीपासून तयार केले जातात.

हे सुद्धा वाचा

1 ऑगस्टला अपोलोची रेंज

दिग्गज टायर निर्माता कंपनी अपोलो टायर्सने देखील 27 जुलैला ईव्ही स्पेसिफिक टायरची रेंज लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनी 1 ऑगस्ट रोजी म्हणजे आजच अधिकृतपध्दतीने ईव्ही टायर रेंजला लाँच करणार आहे. अपोलोची ईव्ही स्पेसिफिक टायर रेंज इलेक्ट्रिक कार आणि टू-व्हीलर दोन्हींसाठी असणार आहे. रिपोट्‌सनुसार समान आकाराचे ईव्ही स्पेसिफिक टायर सध्याच्या टायर्सच्या तुलनेत काही प्रमाणात महाग असण्याची शक्यता आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें