AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ola ने लॉन्च केली नवीन स्कूटर, एका चार्जमध्ये धावणार 301 किमी, किंमत फक्त…

ओलाने लॉन्च केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जमध्ये धावणार 301 किलोमीटर, फीचर्स आणि किंमत सर्व सामान्य नागरिकांच्या बजेटमध्ये. जाणून घ्या सविस्तर

Ola ने लॉन्च केली नवीन स्कूटर, एका चार्जमध्ये धावणार 301 किमी, किंमत फक्त...
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 01, 2026 | 5:09 PM
Share

इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी ओला इलेक्ट्रिकने Ola S1Z हा नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. बजेट सेगमेंटमधील ग्राहकांना लक्षात घेऊन आणलेल्या या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 79999 रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मॉडेलच्या माध्यमातून ओलाने स्वतः विकसित केलेली भारत सेल LFP बॅटरी तंत्रज्ञान प्रथमच सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

Ola S1Z दोन बॅटरी पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. 3.1 kWh व्हेरिएंटची किंमत 79999 रुपये असून, कंपनीच्या दाव्यानुसार ती एका चार्जमध्ये 179 किमीपर्यंत IDC रेंज देतो. या मॉडेलची डिलिव्हरी डिसेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.

तर 5.1 kWh व्हेरिएंटची किंमत 99,999 रुपये असून, त्याची IDC रेंज तब्बल 301 किमीपर्यंत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या व्हेरिएंटची डिलिव्हरी मार्च 2027 पासून सुरू होणार आहे.

4 kW मोटर आणि 70 किमी/तास टॉप स्पीड

दोन्ही व्हेरिएंटमध्ये 4 kW पीक पॉवर देणारी इलेक्ट्रिक मोटर मिळते. स्कूटरचा टॉप स्पीड 70 किमी/तास आहे. 3.1 kWh मॉडेल 40 किमी/तास वेग. चार्जिंगच्या बाबतीत, 3.1 kWh बॅटरीला घरच्या चार्जिंगद्वारे 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 5 तास 42 मिनिटे, तर 5.1 kWh बॅटरीला 6 तास 16 मिनिटे लागतात.

भारत सेल LFP बॅटरी ठरते खास

Ola S1Z ची प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे तिची भारत सेल LFP बॅटरी टेक्नॉलॉजी. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 46-सीरीज लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी ओलाच्या बॅटरी इनोव्हेशन सेंटरमध्ये विकसित करण्यात आली असून, तिचे उत्पादन कंपनीच्या स्वतःच्या गिगाफॅक्टरीमध्ये केले जात आहे. इन-हाऊस बॅटरी उत्पादनामुळे खर्च कमी करून ग्राहकांना तुलनेने कमी किमतीत तंत्रज्ञान देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

फीचर्समध्येही मिळणार अनेक सुविधा

Ola S1Z मध्ये MoveOS 5 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. यात क्रूझ कंट्रोल, अॅडव्हान्स रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिव्हर्स मोड, GPS आणि OTA अपडेट्ससारखे फीचर्स मिळतात. ओला अॅपच्या माध्यमातून जिओ-फेन्सिंग, टाइम-फेन्सिंग, मोड-फेन्सिंग तसेच राइडिंग डेटा यांसारख्या सुविधाही वापरता येतात.

कमी जागेत स्कूटर पार्क करणे सोपे व्हावे यासाठी ‘Easy Park’ फीचर देण्यात आले आहे. अॅक्सिलरेटरच्या हलक्या वापराने स्कूटर पुढे-मागे हलवणे शक्य होते.

Follow Us
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत