AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Pump Fraud : पेट्रोलपंपवर पेट्रोल भरताना या गोष्टी लक्षात ठेवा, लागणार नाही चुना!

Petrol Pump Fraud इंधन भरताना ग्राहकांना पूर्ण इंधन दिलं जात नाही आणि त्यांच्यासोबत फसवणूक केली जाते. अशात लोकांना मोठा फटका बसतो आहे ग्राहकालाही कळत नाही आणि अनेकवेळा पेट्रोल भरून घेताना ग्राहकाची फसवणूक होते

Petrol Pump Fraud : पेट्रोलपंपवर पेट्रोल भरताना या गोष्टी लक्षात ठेवा, लागणार नाही चुना!
पेट्रोलपंपImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 29, 2023 | 8:52 PM
Share

मुंबई : भारतात पेट्रोल पंपावर फसवणूक होणे सामान्य आहे. पेट्रोल पंपावर फसवणुकीचे (Petrol Pump Fraud) प्रकारही समोर आले आहेत. इंधन भरताना ग्राहकांना पूर्ण इंधन दिलं जात नाही आणि त्यांच्यासोबत फसवणूक केली जाते. अशात लोकांना मोठा फटका बसतो आहे ग्राहकालाही कळत नाही आणि अनेकवेळा पेट्रोल भरून घेताना ग्राहकाची फसवणूक होते, हे काम तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच केले जाते. मात्र काही गोष्टींची काळजी घेतल्यास हे टाळता येऊ शकते.

मीटरवर शून्य आहे तपासा

ही सर्वात सामान्य युक्ती आहे, जी पेट्रोल पंपावर अवलंबली जाते. म्हणूनच पेट्रोल डिझेल घेताना मीटरवर लक्ष ठेवा, ते शून्य झाले आहे की नाही. अनेकवेळा ग्राहक मीटरवर लक्ष ठेवत नाही तेव्हा ते शून्य न करता इंधन ओतले जाते. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होत आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 200-300 पेट्रोल घ्यायचे असेल आणि तुमच्या आधी कोणीतरी 100 पेट्रोल घेतले असेल तर या युक्तीने तुमची 100 रुपयांची पेट्रोल फसवणूक होऊ शकते.

इतर गोष्टीत व्यस्त असणे

अनेक वेळा पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक करण्यासाठी तुमचे लक्ष विचलीत होणे कारणीभूत ठरू शकते. जसे की एखाद्या ऑफरबद्दल माहिती देणे, काच साफ करणे, हवा भरणे, परंतु तुम्ही तुमचे लक्ष फक्त मीटरवर ठेवावे.

त्वरित तपासणी करा

जर तुम्हाला कधी शंका आली की तुम्हाला पूर्ण पेट्रोल मिळत नाही, तर तुम्ही पेट्रोल पंपावर बोलून त्याचे प्रमाण तपासू शकता. यासाठी सर्व पेट्रोल पंपांवर एक लिटर उपलब्ध असून तुमच्या समोरील पेट्रोल पंपावर उपस्थित कर्मचारी पेट्रोल बाहेर काढून तपासेल.

नेहमी चांगल्या पेट्रोल पंपावर जा

असे अनेक पंप आहेत जे प्रामाणिकपणे व्यावसाय करतात, अनेक पंप चांगल्या आणि योग्य प्रमाणात इंधन पुरवण्यासाठी ओळखले जातात. तुम्हाला माहीत नसेल तर जवळचा कोणता पेट्रोल पंप चांगला आहे ते शोधा आणि त्यातून इंधन भरा.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.