रक्षा का बंधन: टाटा मोटर्सने हृदयातून दिलेली सुरक्षेची हमी
या रक्षाबंधनाला, टाटा मोटर्सच्या महिलाच चालवणाऱ्या दुर्गा लाईनमधील महिलांनी, ज्या आपल्या देशाचे सर्वात सुरक्षित ट्रक तयार करतात, नवी मुंबईतील कळंबोली येथील ट्रकचालकांसाठी प्रेमाने राख्या तयार केल्या. या राख्या त्यांच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा होत्या आणि एक मोलाची आठवण म्हणजे त्या आमच्या कुटुंबाचा भाग आहेत.

रक्षाबंधन म्हणजे केवळ एक सण नाही, काळजी, विश्वास आणि सुरक्षा या भावनांवर उभारलेली एक सुंदर नाती साजरी करण्याची परंपरा आहे. टाटा मोटर्समध्ये, ही मूल्यं फक्त आमच्या कारखान्यांपुरती मर्यादित नसून ती भारताच्या रस्त्यांवर धावणाऱ्या आपल्या खऱ्या नायकांपर्यंत पोहोचतात. ट्रक चालक… जे अखंड देश चालू ठेवतात.
यावर्षी, टाटा मोटर्स आणि TV9 नेटवर्कच्या सहकार्याने सुरु झालेल्या “रक्षा का बंधन” उपक्रमाअंतर्गत, जमशेदपूर येथील टाटा मोटर्सच्या महिलाच चालवणाऱ्या दुर्गा लाईन मधील कर्मचाऱ्यांनी खास राख्या तयार केल्या, त्या कलंबोली ट्रान्सपोर्ट नगरमधील ट्रकचालकांना पाठवण्यात आल्या.
या महिलांसाठी, भारताच्या रस्त्यांवरील प्रत्येक चालक म्हणजे कुटुंब. प्रत्येक राखीत केवळ रंगीत धागेच नव्हते, तर एक प्रेमळ संदेश होता: “आम्ही तुमची काळजी घेतो. तुमच्या प्रत्येक प्रवासात तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही काम करतो.” प्रत्येक राखीसोबत एक वैयक्तिक चिठ्ठीही होती, जी सांगत होती की टाटा मोटर्सची सुरक्षा ही केवळ यांत्रिक तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाही — ती एक भावना आहे.
या महिला अशा ट्रक तयार करतात, जे प्रगत ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी टेक्नॉलॉजीने सज्ज असतात, जे चालक आणि माल दोघांचीही सुरक्षा सुनिश्चित करतात. यावर्षी पाठवलेल्या या राख्या त्यांच्या त्या मिशनचे प्रतीक आहेत — प्रेम आणि आदराने गुंफलेली सुरक्षा.
कलंबोलीमध्ये जेव्हा या राख्या बांधल्या गेल्या, तेव्हा तिथे चेहऱ्यावर हसू, डोळ्यांत भावना आणि मनात आभार होते. चालकांसाठी हा एक दुर्मिळ आणि भावनिक क्षण होता — की कुणीतरी, कुठेतरी, त्यांच्या सुरक्षिततेचा रोज विचार करतंय.
कारण टाटा मोटर्ससाठी, प्रत्येक चालक हा कुटुंबाचा भाग आहे. आणि कुटुंबासाठी, सुरक्षिततेलाच सर्वोच्च प्राधान्य.
टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स — नेहमीच उत्तम.
