AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामायण फेम अरूण गोविल मर्सिडीजमधून करतात प्रवास, किंमत आणि फीचर्स माहीत आहेत का ?

रामायण मालिकेतील प्रभू रामाची भूमिका साकारल्यानंतर अरुण गोविल यांना न भूतो न भविष्यती अशी प्रसिद्धी मिळाली. त्या मालिकेला इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांची लोकप्रियता कायम आहे. प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे अरूण गोविल यांच्याकडे आलिशान मर्सिडिज कार असून ते त्यातूनच प्रवास करतात. या प्रीमियम कारची वैशिष्ट्ये आणि किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

रामायण फेम अरूण गोविल मर्सिडीजमधून करतात प्रवास, किंमत आणि फीचर्स माहीत आहेत का ?
| Updated on: Jan 20, 2024 | 10:46 AM
Share

मुंबई | 20 जानेवारी 2024 : रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेले अरुण गोविल आजही लोकांच्या हृदयावर राज्य करतात. रामायणातील श्रीरामाची भूमिका त्यांनी ज्या पद्धतीने साकारली आहे, त्यामुळे लोक त्यांना रामाची प्रतिमा मानतात. पण अरुण गोविल यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत असेल. ते कोणत्या गाडीतून प्रवास करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? रील लाइफमध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याकडे असलेल्या च्या कारची किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

रामायण मालिकेत पुष्पक विमान, रथ आणि घोड्यांवर स्वार होऊन प्रवास करणाऱ्या अरुण गोविल यांच्याकडे खऱ्या आयुष्यात मर्सिडीज बेंझ CLA 200 आहे. या प्रीमियम कारची वैशिष्ट्ये आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया.

रामायणातील रामाची सवारी : मर्सिडिज बेंझ CLA 200

रामायणात प्रभू रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी 2022 साली मर्सिडीज बेंझ खरेदी केली. त्याचा फोटो आणि व्हिडीओही त्यांनी शेअर केला होता. त्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी या दोघांनी त्या गाडीवरून पडदा हटवत नवी कार सर्वांना दाखवली.

प्रीमियम कारची फीचर्स

या प्रीमियम कारमध्ये तुम्हाला अनेक स्मार्ट फीचर्स मिळतील. यात 1.3-लिटर, 4-सिलेंडर टर्बोचार्ज्ड इंजिन, 163bhp पॉवर आणि 250Nm टॉर्क, 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, LED हेडलॅम्प आणि टेललाइट, 8-इंच अलॉय व्हील्स, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, cluster2-inch digital infotainment system. ,एम्बिएंट लायटिंग मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजी यांचा समावेश आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

अरुण गोविल यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये अरुण गोविल हे मर्सिडीज बेंझमधून खाली उतरताना दिसत आहेत. या कारचा लूक आणि त्यातील फिचर्स यामुळे कार आणखी खास बनते.

View this post on Instagram

A post shared by Arun Govil (@siyaramkijai)

मर्सिडीज बेंझची किंमत

मर्सिडीज बेंझच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या कारची किंमत 42.80 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 2.55 कोटी रुपयांपर्यंत आहे. कारमध्ये आढळणारी सुरक्षा आणि स्मार्ट वैशिष्ट्ये यामुळे ही कार आणखीनच आरामदायी बनते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.