AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Range Rover SV : संजय दत्त याने खरेदी केली रेंज रोव्हर; किंमत आहे इतकी कोटी? स्वतःचा वाढदिवस असा केला खास

Sanjay Dutt buy Range Rover SV : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने त्याचा 65 वा वाढदिवस साजरा केला. त्याने स्वतःला इतक्या कोटींची रेंज रोव्हर ही आलिशान कार गिफ्ट दिली. या काळ्या रंगाच्या महागड्या एसव्हीमध्ये कमाल फीचर आहेत.

Range Rover SV : संजय दत्त याने खरेदी केली रेंज रोव्हर; किंमत आहे इतकी कोटी? स्वतःचा वाढदिवस असा केला खास
संजय दत्त रेंज रोव्हर एसव्ही
| Updated on: Jul 31, 2024 | 12:17 PM
Share

Range Rover SV Price : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने वाढदिवसाला स्वतःला अनोखे गिफ्ट दिले. त्याने नुकताच 65 वा वाढदिवस साजरा केला. आलिशान आणि महागडी रेंज रोव्हर ही कार त्याने स्वतःला गिफ्ट केली. संजूबाबाने 29 जुलै रोजी त्याच्या वाढदिवसाला नवीन कार खरेदी केली. नवीन कार चालवताना तो मुंबईत दिसला. रेंज रोव्हर कारवर फुलांचा हार आणि हँडल्सवर रिबीन दिसून आली.

संजूबाबाने खरेदी केली नवीन रेंज रोव्हर SV

संजय दत्त यने लँड रोव्हरची सर्वात जबरदस्त व्हर्जनमधील एक कार घेऊन आले आहेत. या SV ला लँड रोव्हरच्या स्पेशल व्हेईकल एडिशन अंतर्गत तयार करण्यात आले आहे. ही एक लक्झिरिअस कार आहे. या रेंज रोव्हर SV मध्ये नवीन फ्रंट बंपर आणि एक five-bar ग्रिल या कारला एक वेगळा लूक देतात. या लक्झरी एसयुव्हीमध्ये 23-इंचाचे अलॉय व्हील्स आहेत.

रेंज रोव्हर SV चे इंटिरिअर

रेंज रोव्हर SV चे इंटिरिअर एकदम खास आहे. या कारचे केबिन लस्टर प्लेटेड वूडपासून तयार करण्यात आले आहे. ही कार स्पेशल 4-सीटरसह येते. या कारच्या स्पेशल पॅकेजमध्ये इलेक्ट्रिकने चालणारे क्लब टेबल आणि एक रेफ्रिजरेटर देण्यात आले आहे. या कारमध्ये मागील प्रवाशांसाठी 13.1-इंचाची इंटरटेनमेंट स्क्रीन पण उपलब्ध आहे. रेंज रोव्हरच्या एसव्हीमध्ये परफॉर्मेंस स्पोर्ट सीटचा वापर करण्यात आला आहे. हे आसन कार्बन फायबरपासून तयार करण्यात आले आहे. या सीटवर SV चा लोगो पण तयार करण्यात आला आहे.

Range Rover SV चा दमदारपणा

रेंज रोव्हर SV मध्ये 4.4-लीटर V8 इंजिन आहे. या कारमध्ये इंजिन 626 bhp चे पॉवर आणि 750 Nm चे पीक टॉर्क मिळतो. या कारमधील 8-स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशनसह जोडण्यात आले आहे. त्यामुळे या कारच्या सर्व चाकांना एक समान पॉवर मिळते. ही कार 3.6 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग धरते. या कारचा सर्वाधिक वेग ताशी 290 किमी आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.