AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electric Car : इलेक्ट्रिक कार घेताय? ‘या’ 5 गोष्टींची घ्या विशेष काळजी

सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक कारचा बोलबाला आहे. वाढत्या पेट्रोल दरापासून सुटका, प्रदूषणात घट होण्यामुळे पर्यावणाचं संवर्धन असे अनेक लाभ इलेक्ट्रिक कारमुळे होतात, असे सांगितले जाते. तुम्हीही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधित काही गोष्टींची नीट माहिती घेऊन मग पुढे जा.

Electric Car : इलेक्ट्रिक कार घेताय? 'या' 5 गोष्टींची घ्या विशेष काळजी
Electric Car : इलेक्ट्रिक कार घेताय? 'या' 5 गोष्टींची घ्या विशेष काळजीImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 11:53 AM
Share

सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक कारचा बोलबाला आहे. वाढत्या पेट्रोल दरापासून सुटका, प्रदूषणात घट होण्यामुळे पर्यावणाचं संवर्धन असे अनेक लाभ इलेक्ट्रिक कारमुळे (Electric Car) होतात, असे सांगितले जाते. भारतातही इलेक्ट्रिक कारचे मार्केट विस्तारत आहे. या कार्सना देशात वाढती मागणी आहे. येत्या काळात टाटा, महिंद्रा ॲन्ड महिंद्रा यांसारख्या कंपन्याही इलेक्ट्रिक कारच्या उत्पादन क्षेत्रात काहीतरी वेगळं घेऊन येतील. जर तुम्हालाही इलेक्ट्रिक कार खरेदी करायची इच्छा असेल तर त्यांसदर्भात पूर्ण माहिती जाणून घ्या आणि मगच पुढे जा. इलेक्ट्रिक कारची किंमत, रनिंग कॉस्ट, मेंटेनन्स कॉस्ट (देखभाल खर्च) (maintenance), फेम आणि राज्याची सब्सिडी, चार्जिंग स्टेशन्स (charging stations) या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात तुमचाच फायदा होईल आणि होणारे नुकसानही टळेल. इलेक्ट्रिक कार घेण्यापूर्वी खाली दिलेल्या गोष्टींबाबत खात्री करून घ्या.

हायब्रिड किंवा फुल इलेक्ट्रिक?

कार घेण्यापूर्वी, तुम्ही जी कार खरेदी करणार आहात ती संपूर्ण इलेक्ट्रिक कार आहे की हायब्रिड , याबाबत नीट खात्री करून घ्यावी. ऑल-इलेक्ट्रिक कार ही संपूर्णपणे बॅटरीवर चालणारी असते. तर हायब्रिड कार ही पेट्रोल, डिझेल इंजिनासह बॅटरीच्या कॉम्बिनेशनवर चालते. कार घेताना संपूर्ण इलेक्ट्रिक कार घेणे कधीही चांगले. त्यामुळे तुमचा पेट्रोल अथवा डिझेलचा खर्च वाचतो.

किंमत सर्वात महत्वाची –

भारतात सध्या इलेक्ट्रिक कारची खप चलती आहे. मात्र किंमतीबाबत बोलायचे झाले तर एका ठराविक बजेटमध्ये कार खरेदी करणाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक कार अजूनही एक स्वप्नच आहे. 10 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे खर्च करायची तयारी असेल, तर इलेक्ट्रिक कार तुमच्या घरात येऊ शकते. त्यामुळे या गाडीच्या किंमतीची नीट चौकशी करावी. तसेच इलेक्ट्रिक कारवर कर, फेम 2 सब्सिडी आणि स्टेट इव्ही सब्सिडी लागू होते, त्याबद्दलही संपूर्ण माहिती घ्यावी.

बॅटरी रेंज आणि टॉप स्पीड –

इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घेण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे फुल चार्जिंग झाल्यानंतर कार किती किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते ? तुमच्या प्राइस रेंजनुसार कमी अथवा अधिका बॅटरी रेंजची इलेक्ट्रिक कार मिळू शकते. त्याशिवाय कारच्या टॉप स्पीडवरही लक्ष ठेवा.

बॅटरी वॉरंटी आणि देखभाल खर्च –

इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यापूर्वी कारच्या बॅटरीवर किती वर्षांची वॉरंटी मिळते, ते जाणून घेणेही गरजेचे आहे. अनेक कार कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कार्सवर 5 ते 8 वर्षांपर्यंतची वॉरंटी देतात. तसेच इलेक्ट्रित कारचा देखभाल खर्च म्हणजेच मेंटेनन्स कॉस्ट किती आहे, याची माहितीही जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच कार खराब झाल्यास त्याच्या दुरूस्तीसाठी किती पैसे लागू शकतात, या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

चार्जिंग स्टेशन्स –

भारतात इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी ग्राहकांमध्ये जागरुकता वाढत आहे, त्यांची विक्रीही वाढताना दिसत आहे. मात्र चार्जिंगच्या सुविधांबाबत बोलायचे झाले तर काही महानगरे सोडल्यास चार्जिंग स्टेशन्स सर्वत्र उपलब्ध नाहीत. सध्या भारतात चार्जिंग स्टेशनची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे येत्या काळात छोट्या शहरांमध्येही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढल्यास आणि जागोजागी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आल्यास, इलेक्ट्रिक कारची विक्री झपाट्याने वाढेल. घरात इलेक्ट्रिक कार लगेच चार्ज करणे शक्य नाही.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.