रॉयल एनफील्डचा मोठा प्लॅन; बंगळुरूमध्ये सुरू केले इलेक्ट्रिक बाइकचे 10 नवीन आउटलेट्स
रॉयल एनफील्डने आपल्या 'Flying Flea C6' या इलेक्ट्रिक बाइकची वाढती मागणी पाहून बंगळुरू शहरात 10 नवीन रिटेल टचपॉइंट्स सुरू केले आहेत. कंपनीने ग्राहकांना उत्तम विक्री आणि सर्व्हिस देण्यासाठी हब-अँड-स्पोक मॉडेल लागू केले आहे. यामुळे ग्राहकांना आता अधिक सुलभ आणि दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये पकड मजबूत करण्यासाठी रॉयल एनफील्डने बंगळुरूमध्ये मोठे नेटवर्क उभे केले आहे. कंपनीच्या नव्या Flying Flea C6 कारची एक्स-शोरूम किंमत 2.79 लाख आहे. विशेष म्हणजे, कंपनीने आणलेल्या ‘बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस’ मॉडेलमुळे ग्राहकांसाठी ही अत्याधुनिक इलेक्ट्रिक बाइक आता अवघ्या 1.99 लाखांपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. रॉयल एनफिल्डने आपला नवीन इलेक्ट्रिक बाईक ब्रँड फ्लाइंग फ्ली ग्राहकांच्या जवळ आणण्यासाठी बंगळुरुमध्ये मोठा विस्तार केला आहे. कंपनीने 10 एप्रिल 2026 रोजी जयनगरमध्ये पहिले स्टोअर उघडले. आता त्यानंतर शहरातील विविध भागात 10 नवीन रिटेल टचपॉइंट्स उघडण्यात आले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, फ्लाइंग फ्ली सी6 इलेक्ट्रिक बाईकला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे हा विस्तार करण्यात आला आहे.
ही नवीन दुकाने अशा ठिकाणी उघडली गेली आहेत जिथे ग्राहक सहजपणे दुचाकी खरेदी करू शकतात तसेच सेवा आणि विक्रीनंतरची सुविधा देखील मिळवू शकतात. ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी कंपनीने हब-अँड-स्पोक मॉडेल तयार केले आहे. बीटीएम लेआउटमध्ये एक मुख्य सर्व्हिस हब तयार केला गेला आहे, जिथे तांत्रिक समर्थन उपलब्ध असेल. त्याचबरोबर शहरातील विविध भागातील सेवा केंद्रे नियमित सेवा व देखभालीचे काम करतील.
रंग आणि किंमत
फ्लाइंग फ्ली सी6स्टॉर्म ब्लॅक आणि फ्ली ग्रीन रंगात खरेदी केले जाऊ शकते. याची एक्स-शोरूम किंमत 2.79 लाख रुपये आहे, तर बॅटरी-एज-ए-सर्व्हिस पर्यायासह त्याची सुरुवातीची किंमत 1.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी प्रत्येक बाईकसह 24×7 रोडसाइड असिस्ट देखील देत आहे.
बॅटरी आणि रेंज
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 3.91 kWh बॅटरी पॅक आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एकदा चार्ज केल्यावर ही रेंज 154 किलोमीटरपर्यंत देते. हे पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटरद्वारे समर्थित आहे जे 15.4 केडब्ल्यू पॉवर आणि 60 एनएम टॉर्क तयार करते. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक केवळ 3.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रति तास वेग पकडू शकते आणि याचा टॉप स्पीड 115 किमी प्रति तास आहे.
फीचर आणि सुरक्षितता
फ्लाइंग फ्ली सी6चे वजन फक्त 124 किलो आहे, ज्यामुळे शहरातील रस्त्यांवर चालणे सोपे होते. यात 19 इंचाची मोठी चाके आणि 90 सेक्शन टायर आहेत. फीचर्सच्या बाबतीत, यात 3.5-इंच गोल टीएफटी कलर डिस्प्ले, ॲडजस्टेबल रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, पाच रायडिंग मोड, लीन-सेन्सिटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल आणि ड्युअल-चॅनेल एबीएस यासारखी आधुनिक फीचर्स मिळतात.