Royal Enfield ची नवीन बाईक फेब्रुवारीत लाँच होणार, Himalayan पेक्षा कमी किंमत

Royal Enfield कंपनी लवकरच आपली नवीन मोटारसायकल लाँच करणार आहे. परंतु हे लाँचिंग यावर्षी होणार नाही, त्यासाठी ग्राहकांना नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

Royal Enfield ची नवीन बाईक फेब्रुवारीत लाँच होणार, Himalayan पेक्षा कमी किंमत
Royal Enfield Himalayan (प्रातिनिधिक फोटो)

मुंबई : Royal Enfield कंपनी लवकरच आपली नवीन मोटारसायकल लाँच करणार आहे. परंतु हे लाँचिंग यावर्षी होणार नाही, त्यासाठी ग्राहकांना नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. कंपनी फेब्रुवारी 2022 मध्ये नवीन मोटारसायकल बाजारात सादर करेल. कंपनीचे नवीन लॉन्च हिमालयन ADV (Himalayan ADV) ची स्वस्त आणि रोड-ओरिएंटेड व्हर्जन असेल. (Royal enfield scram 411 to launch in February 2022, jnow price and features)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय बाजारात या नवीन मॉडेलची विक्री फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू होईल. या बाईकचे नाव Scram 411 असू शकते. परंतु कंपनीने अजून अधिकृतपणे नाव जाहीर केलेले नाही. लॉन्च होणाऱ्या या बाईकची काही माहिती लीक झाली आहे. Scram 411 बद्दलची सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे त्याचं हिमालयन ADV-आधारित एक्सटीरियर. या बाईकला हिमालयनचं अधिक किफायतशीर किंवा रोड आधारित व्हर्जन म्हटलं जात आहे. परंतु कंपनीने अधिकृतपणे असं काही सांगितलेलं नाही.

Scram 411 चे फीचर्स

हिमालयन ही एक अॅडव्हेंचर बाईक आहे. या बाईकमध्ये उंच विंडस्क्रीन, स्प्लिट सीट, स्टँडर्ड लगेज रॅक, मोठे फ्रंट व्हील आणि इतर काही फीचर्स दिले जातात. मात्र scram 411 मध्ये हे फीचर्स दिले जाणार नाहीत. स्क्रॅम 411 मध्ये लहान चाकं, कमी सस्पेंशन ट्रॅव्हल, सिंगल-सीट आणि रियर पिलर ग्रॅब हँडलचा वापर केला जाईल. ही एक शहरी ऑफ रोड बाईक आहे.

इंजिन आणि पॉवर

रॉयल एनफिल्डच्या या नवीन बाईकचे इंजिन डिटेल्स अद्याप उघड करण्यात आलेले नाहीत. LS410, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, SOHC इंजिन या मोटरसायकलमध्ये वापले जाऊ शकते. जे 411cc ची पॉवर जनरेट करते. ट्रान्समिशन आणि गिअरबॉक्ससह त्याच्या एकूण आउटपुटमध्ये कोणताही बदल दिसणार नाही.

चेन्नई-आधारित बाईक निर्मात्या कंपनीने इतर अनेक मॉडेल्स लाँच करण्याची योजना आखली आहे, परंतु ते स्क्रॅमम 411 नंतरच येतील. Scram 411 संदर्भात अनेक लीक समोर आले आहेत, ज्यामध्ये वेगवेगळी माहिती दिली जात आहे. परंतु कंपनीकडून बहुतांश माहितीची पुष्टी झालेली नाही.

इतर बातम्या

Bharat Vehicle Series: अशी करा मार्क BH मालिकेसाठी नवीन नोंदणी, 15 राज्यांमध्ये सेवा सुरू

15 नव्या इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल, जाणून घ्या बसमध्ये काय आहे खास?

डुकाटीची Panigale V4 SP मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Royal enfield scram 411 to launch in February 2022, jnow price and features)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI