नुसता धुर्र! Royal Enfield लवकरच 5 दमदार बाईक भारतात लाँच करणार

Royal Enfield ही कंपनी आता भारतात एक लोकप्रिय बँड बनला आहे. भारतीय ग्राहक या कंपनीच्या बाईक्सची आतुरतेने वाट पाहात असतात.

नुसता धुर्र! Royal Enfield लवकरच 5 दमदार बाईक भारतात लाँच करणार
रॉयल एनफिल्डच्या तीन नव्या बाईक्स लवकरच बाजारात

मुंबई : Royal Enfield ही कंपनी आता भारतात एक लोकप्रिय बँड बनला आहे. भारतीय ग्राहक या कंपनीच्या बाईक्सची आतुरतेने वाट पाहात असतात. तुम्हीसुद्धा आता नवीन बाईक खरेदी करणार असाल तर थोडी वाट पाहा. ही वाट पाहणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण Royal Enfield कंपनी लवकरच भारतात चार नव्या बाईक्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. (Royal Enfield to Launch 5 new Bikes soon)

नवीन रॉयल एनफील्ड हंटर (Royal Enfield Hunter)

ही RE कंपनीची क्लसिक 350cc इंजिन वाली बाईक असेल. काही दिवसांपूर्वी लीक डॉक्यूमेंट्सद्वारे या बाईकबाबतची माहिती समोर आली होती. या बाईकचं नाव Royal Enfield Hunter असं असेल. ही बाईक कंपनीच्या नवीन J प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350)

Classic 350, 350cc सेगमेंटच्या बाईक भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत. आता कंपनी न्यू जनरेशन मॉडल लॉन्च करणार आहे. नवी बाईक यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. नव्या क्लासिक 350 मध्ये 349 cc सिंग-सिलेंडर, एअर-कुल्ड इंजिन असणार आहे जे सध्या RE Meteor 350 मध्ये आहे.

रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 350 (Royal Enfield interceptor 350)

कंपनी सध्या इंटरसेप्टर 350 वर्जनवर काम करत आहे. नव्या वर्जनच्या चाचणीचा फोटो नुकताच समोर आला होता. या मॉडेलमध्ये ट्विन एग्जॉस्ट ऐवजी सिंगल साइड-माउंटेड एग्जॉस्ट देण्यात आलं आहे. याशिवाय बरेच फिचर्स इंटरसेप्टर 650 सारखे असणार आहेत.

रॉयल एनफील्ड 650 क्रूजर (Royal Enfield 650 cruiser)

या बाईकची गेल्या कित्येत दिवसांपासून वाट बघितली जात आहे. अखेर 2021 मध्ये ही बाईक लॉन्च होणार आहे. या बाईकमध्ये लाँग व्हिलबेससोबत स्लंग प्रोफाईल असणार आहे. या बाईकला गोलाकार हेडलॅम्प, मिश्रधातूची चाके, पातळ इंधनाची टाकी, क्रोम ट्विन एक्झॉस्ट कॅनास्टार आणि मोठी सीट असेल.

अपडेटेड रॉयल एनफील्ड हिमालयन (Updated Royal Enfield Himalayan किंवा 2021 Royal Enfield Himalayan)

कंपनी ही बाईक देखील 2021 मध्ये लॉन्च करणार आहे. या बाईकमध्ये न्यू ट्रिपर नेविगेशन सिस्टिम असेल, जी याआधी RE Meteor 350 मध्ये होती. याशिवाय या बाईकमध्ये यूएसबी चार्जरची व्यवस्ता असेल. याशिवाय ही बाईक अनेक रंगांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे (Royal Enfield bikes is planning to launch 4 bikes in 2021).

हेही वाचा

Republic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये जवान फक्त Royal Enfield बाईक्स का वापरतात?

बुलेटप्रेमींसाठी मोठी बातमी, किमती बदलल्या, बुलेट स्वस्त की महाग?

रॉयल एन्फिल्डच्या ग्राहकांना कंपनीकडून खुशखबर

Ola सोबत जोडा तुमची बाईक आणि कमवा पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

(Royal Enfield to Launch 5 new Bikes soon)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI