काय सांगता…! खरंच की काय..! Royal Enfield अशी बाइक आणण्याच्या तयारीत
Royal Enfield बाइक म्हंटलं की तरुणांचा जीव की प्राण असतो. कारण या बाइकवरून रस्त्यावर फेरफटका मारणं एक वेगळीच शान असते. त्यामुळेच तरुणाईमध्ये या बाइकची जबरदस्त क्रेझ आहे. असं असताना कंपनी कात टाकण्याच्या प्रयत्नात आहे.

मुंबई- रॉयल एनफिल्ड या कंपनीच्या बाइकचे देशभरात लाखो चाहते आहेत. रॉयल एनफिल्ड बुलेट म्हटलं की रस्त्यावर चालवताना एक वेगळात साज दिसतो. त्यामुळे तरुणाईमध्ये रॉयल एनफिल्डच्या बाइकची कायमच क्रेझ राहिली आहे.रॉयल एनफिल्ड दमदार इंजिन आणि परफॉर्मन्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहे.असं असताना आता रॉयल एनफिल्ड कात टाकण्याच्या तयारीत आहे. पेट्रोलचं टेन्शन सोडूनआता इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी बाइक तयार करण्यासाठी पावलं उचलत आहे. कारण भारतीय बाजारात गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक बाइकची मागणी वाढली आहे.इलेक्ट्रिक वर्जनमध्ये आपलं वेगळेपण जपण्याचं मोठं आव्हान कंपनीपुढे असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल एनफिल्ड 2024 च्या दुसऱ्या सहामाहीत नवी बाइक लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनी e-Bike एका वेगळ्याच थाटात आणण्यासाठी सज्ज आहे.सध्या जगभरात स्कूटर आणि मोपेड दुचाकी इलेक्ट्रिफिकेशन करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
कशी असेल रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाइक
रॉयल एनफिल्ड आपल्या अपकमिंग इलेक्ट्रिक बाइकमध्ये जबरदस्त परफॉर्मन्ससाठी 96V सिस्टमचा वापर करू शकते. ऑटो वेबसाइट ऑटोकार इंडियाने दिलेल्या माहितीनुसार कंपनी प्रवक्त्यांनी सांगितलं की, “आम्ही मिड वेट सेगमेंटमध्ये मजबूत इलेक्ट्रिक बाइक आणण्याच्या तयारीत आहे. आमचं या सेगमेंटमध्ये नक्कीच वेगळेपण असणार आहे. भविष्यातील ईव्हीची गरज पाहून कंपनीने आपली कंबर कसली आहे.”
इलेक्ट्रिक बाइकसाठी नव्या प्लॅटफॉर्मचा कोडनेम L असणार आहे. यासाठी कंपनीने ग्राहकांच्या दृष्टीकोनातून वेगवेगळ्या रेंजच्या बाइक तयार करण्यासाठी पावलं उचलली आहेत. एल प्लॅटफॉर्म अंतर्गत L1A, L1B आणि L1C तीन बॉडी स्टाईल असतील. कंपनी सध्या 20 हून अधिक प्रोजेक्टवर काम करत आहे. रॉयल एनफिल्डने यासाठी स्पेनची इलेक्ट्रिक बाइक कंपनी स्टार्क फ्युचर एसएलमध्ये 10 टक्के भागीदारी विकत घेतली आहे. स्टार्कसह इंडियन बाइक कंपनी इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये काम करेल.रॉयल एनफिल्डच्या नव्या प्रोजेक्टमध्ये स्टार्क कंपनीचं तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. स्पेनच्या कंपनीचं या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. माहितीनुसार कंपनी यासाठी 150 मिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. या कामासाठी कंपनीने ओला इलेक्ट्रिकचे माजी मुख्य टेक्निकल ऑफिसर उमेश कृष्णप्पा यांची नियुक्ती केली आहे.
Super Meteor 650 vs Interceptor 650
रॉयल एनफिल्डने मार्केटमध्ये Super Meteor 650 बाइक लाँच केली आहे. मात्र रॉयल एनफिल्डचे चाहते या गाडीची तुलना Interceptor 650 शी तुलना करत आहेत. रॉयल एनफिल्डच्या दोन्ही गाड्या बघितल्या बघितल्या प्रेमात पडायला होतं. सुपर मेट्योर 650 ही बाइक क्रुझर बाइकसारखी आहे. ही गाडी पाहिल्यानंतर रेट्रो लूक भावतो. किंमतीच्या बाबतीत म्हणायचं तर मेट्योर ही इंटसेप्टरपेक्षा महाग आहे.इंटरसेप्टर या गाडीची किंमत 2.89 लाख (एक्स शोरुम) रुपयांपासून सुरु होते. तर सुपर मेट्योरची सुरुवात 3.49 लाखांपासून (एक्स शोरुम) सुरु होते. या दोन्ही किमतींमध्ये जवळपास 60 हजार रुपयांचं अंतर आहे.
