AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना महामारीच्या काळातही वाहन कंपन्यांच्या विक्रीत वाढ, Tata, Nissan, MG चा बोलबाला

वाहन उद्योगासाठी (ऑटो इंडस्ट्री) 2021 हे वर्ष अनेक आव्हानांनी भरलेले होतं. यादरम्यान, सेमीकंडक्टरचा तुटवडा, वाढता इनपुट खर्च आणि कोरोना निर्बंधांमुळे वाहनांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला.

कोरोना महामारीच्या काळातही वाहन कंपन्यांच्या विक्रीत वाढ, Tata, Nissan, MG चा बोलबाला
Cars (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : वाहन उद्योगासाठी (ऑटो इंडस्ट्री) 2021 हे वर्ष अनेक आव्हानांनी भरलेले होतं. यादरम्यान, सेमीकंडक्टरचा तुटवडा, वाढता इनपुट खर्च आणि कोरोना निर्बंधांमुळे वाहनांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला. तथापि, असे असूनही, निसान मोटर इंडिया आणि एमजी मोटर इंडियाच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. (Sales of Nissan, MG and Tata Motors increased even in Corona Cerisis period)

डिसेंबर 2021 मध्ये देशांतर्गत बाजारात निसान मोटर इंडियाची विक्री दुप्पट होऊन 3,010 युनिट्स इतकी झाली आहे. त्याच वेळी, एमजी मोटर इंडियाची किरकोळ विक्री गेल्या वर्षी 2021 मध्ये 43 टक्क्यांनी वाढून 40,273 युनिट्सवर पोहोचली आहे. निसान मोटर इंडिया भारतीय बाजारपेठेत निसान आणि डॅटसन या दोन ब्रँडच्या कार विकते. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने देशांतर्गत बाजारात 1,159 वाहनांची विक्री केली होती.

निसान मोटर इंडियाने नोंदवली 323 टक्के वाढ

Nissan Motor India ने शनिवारी एका निवेदनात सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या नऊ महिन्यांत (एप्रिल-डिसेंबर 2021) मध्ये, त्यांची देशांतर्गत बाजारपेठेत 27,965 युनिट्सची विक्री झाली होती, जी मागील वर्षी याच कालावधीत 6,609 युनिट्स होती. निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव म्हणाले, “कोविड-19 चे आव्हान आणि सेमीकंडक्टरची कमतरता असतानाही निसानने एकूण 323 टक्के वाढ नोंदवली आहे.”

हेक्टर एसयूव्हीने एमजी मोटर इंडियाची विक्री वाढवली

एमजी मोटर इंडियाने 2021 मध्ये 40,273 वाहने विकली आहेत तर कंपनीने 2020 मध्ये 28,162 वाहनांची विक्री केली होती. गेल्या वर्षी कंपनीच्या विक्रीत हेक्टर एसयूव्हीचा मोठा वाटा होता. यावेळी कंपनीने हेक्टर एसयूव्हीच्या 31,509 युनिट्सची विक्री केली. याशिवाय, कंपनीने वर्षभरात Gloster SUV च्या 3,823 युनिट्स, ZS EV च्या 2,798 युनिट्स आणि Aster SUV च्या 2,143 युनिट्सची विक्री केली आहे.

टाटा मोटर्सच्या विक्रीत 50% वाढ

डिसेंबर 2021 मध्ये टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांची एकूण विक्री 50 टक्क्यांनी वाढून 35,299 युनिट्सवर पोहोचली आहे. टाटा मोटर्सने शेअर बाजाराला सांगितले की, कंपनीने वर्षभरापूर्वी याच महिन्यात एकूण 23,545 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने म्हटले आहे की, डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत त्यांची एकूण प्रवासी वाहनांची विक्री 99,002 युनिट्स इतकी होती जी मागील वर्षी याच कालावधीत 68,806 युनिट्स होती. अशा प्रकारे त्यात 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इतर बातम्या

Yamaha 2022 मध्ये दोन शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या खासियत

Ola कडून हायपरचार्जर इन्स्टॉल करण्यास सुरुवात, ग्राहकांसाठी मोफत फास्ट चार्जिंग सुविधा

ईव्ही स्टार्टअप GT Force च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक सादर, जाणून घ्या दुचाकींची खासियत

(Sales of Nissan, MG and Tata Motors increased even in Corona Cerisis period)

'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.