AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर, अख्खं मार्केट ‘इलेक्ट्रिक’चं; भारतीयांना हवाय पेट्रोल-डिझेलला पर्याय

ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक (Electric Vehicle) किंवा हायब्रिड वाहनांकडे वाढीस लागला आहे. जगभरातील वाहन धारकांच्या अभ्यास करून डेलॉईटने अहवाल बनविला आहे.

...तर, अख्खं मार्केट ‘इलेक्ट्रिक’चं; भारतीयांना हवाय पेट्रोल-डिझेलला पर्याय
इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढणार
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Feb 09, 2022 | 9:34 PM
Share

नवी दिल्ली– आगामी काळात भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या संख्येत वाढ होऊ शकते असा अंदाज वाहन विषयक अभ्यास करणाऱ्या डेलॉईटने (Deloitte) व्यक्त केला आहे. भारतीयांची वाहनांबद्दल असलेल्या विचारांत बदल झाला आहे. इलेक्ट्रिक वाहनांत रस दाखविणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक (Electric Vehicle) किंवा हायब्रिड वाहनांकडे वाढीस लागला आहे. जगभरातील वाहन धारकांच्या अभ्यास करून डेलॉईटने अहवाल बनविला आहे. भारतात पर्यावरण-अनुकूल आणि कोविड प्रकोपामुळे सर्वोत्तम वाहतूक साधनांवर अधिक भर दिला जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची (CHARGING STATION) उभारणी केल्यास वापराला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय प्रदूषणाबाबत चिंतीत

अहवालात 59 टक्के भारतीय ग्राहक प्रदूषणाबाबत चिंतेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पेट्रोल-डिझेल किंवा अन्य इंधनामुळे प्रदूषण पातळीत होत असलेल्या वाढीबद्दल भारतीय ग्राहक चिंतेत आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी करणाऱ्या इंधनाच्या शोधांत भारतीयांचा कल असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आलं आहे. ग्रीन एनर्जी उपक्रमाअंतर्गत वाहन उद्योगाला प्रोत्साहन देण्याची घोषणा अर्थसंकल्पात नुकतीच करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी केल्यास वापराला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. डेलॉईट इंडियाचे भारतातील प्रमुख राजीव सिंह यांनी ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि नवीन संशोधन नुसार वाहन क्षेत्रात प्रगतीच्या संधी जाणवत आहेत. येत्या काळात भारतात दोन-तीन चाकी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या संख्येत भर पडेल अशा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला आहे.

चार्जिंग स्टेशनचं जाळं:

केंद्र सरकारने देशभरात ईलेक्ट्रिक वाहनांसाठीचे चार्जिंग पॉईंटस उभारण्याची योजना आखली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. देशातील सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्या HPC, BPCL आणि IOC देशात 22 हजार इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स स्थापन करतील. BPCL देशात 7000 ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्याचवेळी, HPCL 5000 आणि IOC एकूण 10,000 EV चार्जिंग स्टेशन उभारेल. अनेक रस्ते आणि मार्केटमध्ये चार्जिंग पॉइंट बसवण्याचे कामही सुरू झाले आहे. पेट्रोल पंपांनाही त्यांच्या कॅम्पसमध्ये ई-वाहन चार्जिंग सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मेड इन इंडिया Simple One इलेक्ट्रिक स्कूटरचे करण्यात आले नविन अपग्रेड, पावरफुल मोटरपेक्षा असेल भन्नाट परफॉर्मेंस!

प्रतीक्षा संपली! Kia Carens 15 फेब्रुवारीला बाजारात, Alcazar आणि Safari ला टक्कर

Hyundai Controversy: काश्मीर मुद्द्यावरुन ह्युंडईची माफी, तरीही Twitter वर #BoycottHyundai ट्रेंड का?

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत