AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skoda ची पहिली मेड इन इंडिया SUV 18 मार्चला लाँच होणार

Skoda Vision In Concept या कारने ऑटो एक्सपो 2020 मध्ये जगभरातील कारप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं होतं.

Skoda ची पहिली मेड इन इंडिया SUV 18 मार्चला लाँच होणार
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 17, 2021 | 2:28 PM
Share

मुंबई : Skoda Vision In Concept या कारने ऑटो एक्सपो 2020 मध्ये जगभरातील कारप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं होतं. अखेर या कारला नाव आणि ओळख मिळाली आहे. कंपनीने या कारला स्कोडा कुशक (Skoda Kushaq) असं नाव दिलं आहे. कंपनीने कुशक हा शब्द संस्कृत भाषेतून घेतला आहे. कुशक या शब्दाचा अर्थ आहे शासक, सम्राट किंवा राजा. ही व्हीकल ह्युंदाय क्रेटा आणि किया सेल्टोस या गाड्यांना मार्केटमध्ये टक्कर देणार आहे. या मॉडेलचं लेटेस्ट अपडेट कंपनीने सादर केलं आहे. दरम्यान, ही कार 18 मार्चला लाँच केली जाणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीने याबाबतची माहिती ट्विटरद्वारे शेअर केली आहे. ही कार फोक्सवॅगन ग्रुपच्या ‘इंडिया 2.0’ प्रोजेक्टअंतर्गत तयार करण्यात आलेली पहिली कार आहे. (Skoda Kushaq will launch on 18th March, 93 percent parts of car are made in India)

कंपनीने म्हटलं आहे की, कुशक ही कार यावर्षी भारतात लाँच केली जाईल. ही कार 93 टक्के भारतीय बनावटीची आहे. कारण या कारमधील 93 टक्के भाग हे भारतात बनवण्यात आले आहेत, अगदीच काही भाग परदेशातून आयात करण्यात आले आहेत. कंपनीने या व्हीकलच्या इंजिन ऑप्शन्स आणि डायमेंशनसह कम्फर्टवर बरंच काम केलं आहे. स्कोडा कुशक MQB-IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये 2651 मिमीचं व्हीलबेस असेल जे स्कोडा कॉन्सेप्टच्या व्हीलबेसच्या तुलनेत 20 मिमी लहान आहे. कुशकच्या टॉप-एंड ट्रिम्समध्ये एलईडी हेडलाइट्स आणि डे टाईम रनिंग लाइट्सची (डीआरएलएस) सुविधा असेल. टेल आणि ब्रेक लाइट्सही देण्यात आल्या आहेत.

शानदार फिचर्स

ही भारतातील स्कोडाची पहिली कनेक्टेड कार असेल ज्यामध्ये MySkoda Connect टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये लेटेस्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह 12.3 इंचांची सेंट्रल टच स्क्रीन दिली जाणार आहे. यामध्ये ऑटोमॅटिक एयर कंट्रोल सिस्टिम, सनरुफ आणि अडॅप्टिव्ह लाईटसारखे फिचर्स दिले जाणार आहेत. कारच्या सुरक्षेबाबत बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 6 एयरबॅग्स (ऑप्शनल फ्रंट साईड एयरबॅग आणि कर्टेन एयरबॅग) असतील. तसेच सर्व ट्रिम्समध्ये स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) दिलं जाईल. तर टॉप-वेरिएंटमध्ये हिल-होल्ड कंट्रोल, रेन-लाईट सेन्सर, एक क्रुझ कंट्रोल सिस्टिम आणि टायर प्रेशर मॉनिटरही दिले जातील.

कुशक नावामागची कथा

स्कोडा कंपनीने कुशक या कारबाबत माहिती दिली आहे की, संस्कृत भाषा जगभरातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. ही आता भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. या नावाद्वारे कंपनी स्वतःला भारतीय उपमहाद्वीपाशी जोडू पाहतेय. तसेच ‘कुशक’ नावाचा अर्थ कंपनीच्या या मॉडलसाठी परफेक्ट आहे, असंही कंपनीने म्हटलं आहे. ‘स्कोडा कुशक’ या नावाची घोषणा करताना कंपनीने ‘Make way for the one true king’ ही टॅगलाइनही दिली आहे.

इंडिया 2.0 प्रोजेक्ट

चेक प्रजासत्ताक (Czech Republic) देशातील आघाडीची कार निर्माती कंपनी स्कोडाने भारतातील त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी इंडिया 2.0 प्रकल्पाची सुरुवात केली आहे. ‘कुशक’ ही स्कोडाची या प्रकल्पांतर्गत पहिली कार आहे. कंपनीने ही कार स्थानिक स्तरावरील Modulare Querbaukasten (MQB) A0 IN प्लॅटफॉर्मवर बनवली आहे.

कुशकच्या स्पेलिंगमध्ये Q कशाला?

जर तुम्हाला कुशकचं इंग्रजी स्पेलिंग लिहायला सांगितलं तर त्याचं स्पेलिंग तुम्ही ‘Kushak’ असं लिहाल. परंतु, कंपनीने कुशकच्या नावात ‘Q’ चा वापर केला आहे. कंपनीने ‘Kushaq’ असं स्पेलिंग लिहिलं आहे. यामागे कंपनीचा एक वेगळा विचार आहे. स्कोडा ऑटोच्या अन्य अनेक गाड्यांचं स्पेलिंग ‘K’ पासून सुरु होतं आणि शेवटी ‘Q’ असतो, (उदा. KODIAQ, KAROQ आणि KAMIQ). कुशकही याच रेंजमधील कार आहे, त्यामुळे कुशकच्या स्पेलिंगमध्ये कंपनीने शेवटच्या ‘K’ ऐवजी ‘Q’ लिहिला आहे.

हेही वाचा

Volkswagen च्या लोकप्रिय Polo आणि Vento चं टर्बो एडिशन लाँच, स्पोर्टी लुकसह किंमतही कमी

Renault ची किफायतशीर SUV Kiger लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देशातील टॉप ऑटोमाबाईल कंपनीच्या वाहनविक्रीत घट, पुन्हा नंबर वन होण्यासाठी मास्टर प्लॅन

एमजी मोटर इंडियाची नवी एसयुव्ही कार लवकरच बाजारात, जाणून घ्या या कारमध्ये काय आहे खास?

(Skoda Kushaq will launch on 18th March, 93 percent parts of car are made in India)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल