AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skoda च्या गाडीला संस्कृत नाव, पहिली मेड इन इंडिया SUV लाँच होणार

Skoda Vision In Concept या कारने ऑटो एक्सपो 2020 मध्ये जगभरातील कारप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं होतं. (Made in India Skoda Kushaq SUV to launch in March)

Skoda च्या गाडीला संस्कृत नाव, पहिली मेड इन इंडिया SUV लाँच होणार
| Updated on: Feb 03, 2021 | 6:00 PM
Share

मुंबई : Skoda Vision In Concept या कारने ऑटो एक्सपो 2020 मध्ये जगभरातील कारप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं होतं. अखेर या कारला नाव आणि ओळख मिळाली आहे. कंपनीने या कारला स्कोडा कुशक (Skoda Kushaq) असं नाव दिलं आहे. कंपनीने कुशक हा शब्द संस्कृत भाषेतून घेतला आहे. कुशक या शब्दाचा अर्थ आहे शासक, सम्राट किंवा राजा. ही व्हीकल ह्युंदाय क्रेटा आणि किया सेल्टोस या गाड्यांना मार्केटमध्ये टक्कर देणार आहे. या मॉडेलचं लेटेस्ट अपडेट कंपनीने सादर केलं आहे. (Made in India Skoda Kushaq SUV launch in March with these powerful feature)

कंपनीने म्हटलं आहे की, कुशक ही कार यावर्षी भारतात लाँच केली जाईल. ही कार 93 टक्के भारतीय बनावटीची आहे. कारण या कारमधील 93 टक्के भाग हे भारतात बनवण्यात आले आहेत, अगदीच काही भाग परदेशातून आयात करण्यात आले आहेत. कंपनीने या व्हीकलच्या इंजिन ऑप्शन्स आणि डायमेंशनसह कम्फर्टवर बरंच काम केलं आहे. स्कोडा कुशक MQB-IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये 2651 मिमीचं व्हीलबेस असेल जे स्कोडा कॉन्सेप्टच्या व्हीलबेसच्या तुलनेत 20 मिमी लहान आहे. कुशकच्या टॉप-एंड ट्रिम्समध्ये एलईडी हेडलाइट्स आणि डे टाईम रनिंग लाइट्सची (डीआरएलएस) सुविधा असेल. टेल आणि ब्रेक लाइट्सही देण्यात आल्या आहेत.

शानदार फिचर्स

ही भारतातील स्कोडाची पहिली कनेक्टेड कार असेल ज्यामध्ये MySkoda Connect टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये लेटेस्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह 12.3 इंचांची सेंट्रल टच स्क्रीन दिली जाणार आहे. यामध्ये ऑटोमॅटिक एयर कंट्रोल सिस्टिम, सनरुफ आणि अडॅप्टिव्ह लाईटसारखे फिचर्स दिले जाणार आहेत. कारच्या सुरक्षेबाबत बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 6 एयरबॅग्स (ऑप्शनल फ्रंट साईड एयरबॅग आणि कर्टेन एयरबॅग) असतील. तसेच सर्व ट्रिम्समध्ये स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) दिलं जाईल. तर टॉप-वेरिएंटमध्ये हिल-होल्ड कंट्रोल, रेन-लाईट सेन्सर, एक क्रुझ कंट्रोल सिस्टिम आणि टायर प्रेशर मॉनिटरही दिले जातील.

कुशक नावामागची कथा

स्कोडा कंपनीने कुशक या कारबाबत माहिती दिली आहे की, संस्कृत भाषा जगभरातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. ही आता भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. या नावाद्वारे कंपनी स्वतःला भारतीय उपमहाद्वीपाशी जोडू पाहतेय. तसेच ‘कुशक’ नावाचा अर्थ कंपनीच्या या मॉडलसाठी परफेक्ट आहे, असंही कंपनीने म्हटलं आहे. ‘स्कोडा कुशक’ या नावाची घोषणा करताना कंपनीने ‘Make way for the one true king’ ही टॅगलाइनही दिली आहे.

इंडिया 2.0 प्रोजेक्ट

चेक प्रजासत्ताक (Czech Republic) देशातील आघाडीची कार निर्माती कंपनी स्कोडाने भारतातील त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी इंडिया 2.0 प्रकल्पाची सुरुवात केली आहे. ‘कुशक’ ही स्कोडाची या प्रकल्पांतर्गत पहिली कार आहे. कंपनीने ही कार स्थानिक स्तरावरील Modulare Querbaukasten (MQB) A0 IN प्लॅटफॉर्मवर बनवली आहे.

कुशकच्या स्पेलिंगमध्ये Q कशाला?

जर तुम्हाला कुशकचं इंग्रजी स्पेलिंग लिहायला सांगितलं तर त्याचं स्पेलिंग तुम्ही ‘Kushak’ असं लिहाल. परंतु, कंपनीने कुशकच्या नावात ‘Q’ चा वापर केला आहे. कंपनीने ‘Kushaq’ असं स्पेलिंग लिहिलं आहे. यामागे कंपनीचा एक वेगळा विचार आहे. स्कोडा ऑटोच्या अन्य अनेक गाड्यांचं स्पेलिंग ‘K’ पासून सुरु होतं आणि शेवटी ‘Q’ असतो, (उदा. KODIAQ, KAROQ आणि KAMIQ). कुशकही याच रेंजमधील कार आहे, त्यामुळे कुशकच्या स्पेलिंगमध्ये कंपनीने शेवटच्या ‘K’ ऐवजी ‘Q’ लिहिला आहे.

हेही वाचा

स्क्रॅपेज पोलिसी लागू झाल्यानंतर 20 वर्ष जुन्या कार भंगारात जाणार? जाणून घ्या तुमच्याकडील पर्याय

15 वर्षांहून जुनी वाहनं 1 एप्रिलपासून थेट भंगारात; नितीन गडकरींची महत्त्वाच्या धोरणाला मंजुरी

Citroen C5 एयरक्रॉस लाँचिंगसाठी सज्ज, फिचर्सच्या बाबतीत बड्या कंपनीच्या SUVs ना मागे टाकणार?

2021 च्या पहिल्या तिमाहीत लक्झरी कार्सचा धडाका, Mercedes, BMW, Skoda च्या शानदार कार्स लाँच

इलेक्ट्रिक सनरूफ फंक्शन आणि कनेक्टेड कार टेकसह 2021 Mahindra XUV300 लाँच, जाणून घ्या किंमत

(Made in India Skoda Kushaq SUV launch in March with these powerful feature)

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.