AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रायडर्ससाठी बाजारात आले स्मार्ट हेल्मेट, ब्ल्युटुथ कनेक्टीव्हीटी सह ४८ तासांचा टॉक टाईम, किंमत पाहा

दुचाकी चालकांसाठी बाजारात स्मार्ट हेल्मेट आले असून या हेल्मेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा यांचा अनोखा मिलाफ आहे.

रायडर्ससाठी बाजारात आले स्मार्ट हेल्मेट, ब्ल्युटुथ कनेक्टीव्हीटी सह ४८ तासांचा टॉक टाईम, किंमत पाहा
Steelbird Smart Helmet
| Updated on: Oct 17, 2025 | 8:13 PM
Share

Steelbird Smart Helmet: यंदाच्या दिवाळीत दुचाकी चालकांसाठी स्टीलबर्ड हायटेक इंडिया कंपनीने नवीन स्मार्ट हेल्मेट बाजारात आणले आहेत. SBH-32 Aeronautics नावाच्या हेल्मेटची खासीयत म्हणजे याचे तंत्रज्ञान आणि सेफ्टी यांचा असलेला उत्तम मिलाफ होय. खास करुन हे हेल्मेट आधुनिक रायडर्ससाठी विकसित केले आहे. आता या हेल्मेटमुळे लांबचा प्रवास देखील सोपा आणि सुरक्षित होणार आहे.

स्मार्ट कनेक्टिव्हीटीसह ब्लूटूथ 5.2

या स्मार्ट SBH-32 Aeronautics हेल्मेटमध्ये ब्लूटूथ 5.2 दिलेला आहे. त्याचा 48 तासांचा टॉक टाईम असून स्टँडबाय टाईम 110 तासांचा आहे. या द्वारे रायडर प्रवासात असताना कॉल घेऊ शकतो. तसेच नेव्हीगेशन आणि म्युझिकचा देखील आनंद घेऊ शकतो तेही सेफ्टीशी तडजोड न करता.

ड्युअल सर्टिफिकेशन: DOT आणि ISI

महत्वाचे म्हणजे हे हेल्मेट DOT (FMVSS No. 218) आणि BIS (IS 4151:2015) दोन्ही स्टँडर्डने प्रमाणित केलेले आहे.याचा अर्थ हे हेल्मेट केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील रायडर्सना विश्वासार्ह सुरक्षा प्रदान करत आहे.

उत्तम सुरक्षा आणि एअरोडायनामिक डिझाईन

SBH-32 चे शेल PC-ABSब्लेंडपासून तयार केले आहे. ज्यामुळे कोणत्याही धक्क्यांपासून हे सुरक्षा पुरवते. या हेल्मेटमध्ये एअर वेंट्स , विंड डिफ्लेक्टर, वॉर्टेक्स जनरेटर आणि रिअर स्पॉईलर दिलेले असल्याने वेगाने राईड करणात हवेचा प्रतिरोध कमी होतो आणि स्थिरता वाढते.

पिनलॉक-रेडी विजर आणि नाईट सेफ्टी

हेल्मेटचा पॉलीकार्बोनेट विजर पिनलॉक-रेडी, एंटी -स्क्रॅच आणि युव्ही प्रोटेक्टेड आहे. रात्रीच्या वेळी राईड करताना पाठच्या बाजूला रिफ्लेक्टिव्ह एलिमेंट्स रायडरची दृश्यता वाढवतात, त्यामुळे सुरक्षा आणखीन सुनिश्चित होते.

आरामदायक इंटेरिअर आणि फिटींग

SBH-32 हेल्मेटच्या आतील पॅडिंग रिमुव्हेबल आणि वॉशेबल आहे.त्यामुळे घाम शोषून आणि हवा देखील खेळती रहाते. हाय डेन्सिटी चीक पॅड आणि डबल D-रिंग फास्टनर हेल्मेटला आरामदायी आणि सुरक्षित बनवतात.

साईज आणि किंमत

हे हेल्मेट 580 mm, 600 mm आणि 620 mm साईजमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 4399 रुपये आहे. हे हेल्मेट प्रीमियम सेफ्टी आणि मॉर्डन तंत्रज्ञानाचे असल्याने ही किंमत जास्त नाही. SBH-32 Aeronautics हेल्मेट सर्व भारतीय रायडर्ससाठी भरोसेमंद आणि चांगला ऑप्शन आहे.

पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्...
पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्....
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!.
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्...
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्....
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?.
अर्ज भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशी मोठी गर्दी, कुठं काय स्थिती?
अर्ज भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशी मोठी गर्दी, कुठं काय स्थिती?.
...तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? सुषमा अंधारेंचा थेट सवाल
...तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? सुषमा अंधारेंचा थेट सवाल.
पुतळ्याचं अनावरण 4 महिने अनावरण का रखडलं? अमित ठाकरेंचा थेट सवाल
पुतळ्याचं अनावरण 4 महिने अनावरण का रखडलं? अमित ठाकरेंचा थेट सवाल.
मोठी बातमी! आता बिबट्याचीही नसबंदी, बिबट्यांची दहशत अन् वावर कमी होणार
मोठी बातमी! आता बिबट्याचीही नसबंदी, बिबट्यांची दहशत अन् वावर कमी होणार.
बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्याचा उच्छाद; थेट पडला विहिरीत
बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्याचा उच्छाद; थेट पडला विहिरीत.
नीच... जरांगेंचा अजितदादांसह फडणवीसांवर गंभीर आरोप अन् मुंडेंवर निशाणा
नीच... जरांगेंचा अजितदादांसह फडणवीसांवर गंभीर आरोप अन् मुंडेंवर निशाणा.