SUV : भारतात SUV खरेदीची क्रेझ वाढतेय, कंपन्यांनी 5 वर्षांत 36 मॉडेल केले लाँच, कारणं जाणून घ्या…

भारतातील SUV वाहनांच्या ऑर्डरमध्ये झालेली वाढ ग्राहकांमध्ये SUV ची वाढती लोंकप्रियता दिसून येत आहे. सनरूफ आणि कनेक्टेड टेक्नॉलॉजीसारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

SUV : भारतात SUV खरेदीची क्रेझ वाढतेय, कंपन्यांनी 5 वर्षांत 36 मॉडेल केले लाँच, कारणं जाणून घ्या...
भारतात SUV खरेदीची क्रेझ वाढतेयImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 9:31 AM

मुंबई :  कार (New Car) घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्याही घरासमोर सुंदर कार असावी, तीही चांगल्या कंपनीची असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कारची पाहणी केली जाते. गुगलवरुन माहिती घेतली जाते. आम्ही देखील आज तुम्हाला एसयूव्हीविषयी सांगणार आहोत. भारतातील ग्राहकांची एसयूव्ही (SUV) वाहने खरेदी करण्याची क्रेझ सातत्यानं वाढत आहे. यामुळेच कदाचित गेल्या पाच वर्षांत 36 एसयूव्ही मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आली आहेत. SUV ची ‘क्रेझ’ इतकी आहे की काही लोकप्रिय मॉडेल्स विकत घेण्यासाठी लोकांना दोन वर्षे वाट पहावी लागते. परंतु त्यानंतरही ऑर्डरचा वर्षाव होत आहे. कार (Car) खरेदीदार वाहनांवर अधिक खर्च करण्यास तयार आहेत आणि सनरूफ आणि नवीनतम तंत्रज्ञानासारखी वैशिष्ट्ये असलेल्या वाहनांच्या शीर्ष मॉडेलला प्राधान्य देत आहेत.

एसयूव्ही होतेय लोकप्रिय

ज्या बाजारात हॅचबॅकची विक्री सर्वात जास्त असायची, तिथे एंट्री-लेव्हल आणि मिड-साईज स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स (SUV) अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत आणि त्यामुळेच या श्रेणीतील नवीन मॉडेल बाजारात आणले जात आहेत.

SUV चे 40 टक्के योगदान

मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (विक्री विपणन), शशांक श्रीवास्तव म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत SUV श्रेणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. उद्योगातील SUV श्रेणीचे योगदान, जे पूर्वी सुमारे 19 टक्के होते. ते 2021-22 मध्ये 40 टक्क्यांपर्यंत वाढले आहे आणि ते आणखी वाढत आहे.

हे सुद्धा वाचा

प्रीमियम हॅचबॅकला मागे टाकते

मागणी वाढल्यानं एंट्री-लेव्हल एसयूव्ही श्रेणीने गेल्या आर्थिक वर्षात देशांतर्गत प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत सर्वात मोठा वाटा उचलला आणि 2011 पासून बाजारपेठेत राज्य करत असलेल्या प्रीमियम हॅचबॅकला मागे टाकले.

संक्षिप्त आणि मध्यम आकाराच्या एसयूव्ही

गेल्या वर्षी 30.68 लाख वाहनांपैकी 6.52 लाख एंट्री-लेव्हल एसयूव्ही होत्या.आश्चर्याची गोष्ट नाही की, गेल्या पाच वर्षांत, प्रवासी वाहन श्रेणीतील बहुतेक मॉडेल्स कॉम्पॅक्ट आणि मध्यम आकाराच्या एसयूव्ही होत्या.

SUV ची ‘क्रेझ’ इतकी आहे की काही लोकप्रिय मॉडेल्स विकत घेण्यासाठी लोकांना दोन वर्षे वाट पहावी लागते. परंतु त्यानंतरही ऑर्डरचा वर्षाव होत आहे. कार खरेदीदार वाहनांवर अधिक खर्च करण्यास तयार आहेत आणि सनरूफ आणि नवीनतम तंत्रज्ञानासारखी वैशिष्ट्ये असलेल्या वाहनांच्या शीर्ष मॉडेलला प्राधान्य देत आहेत.

कार घेणाऱ्यांना एसयूव्ही मॉडेलचा विचार देखील करायला हवा. याची लोकप्रियता पाहता मागणी देखील अधिक आहे. यामध्ये आपल्याला आवश्यक असलेले फीचर्स ज्या कंपनीच्या कारमध्ये असतील तीच कार घ्यावी.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.