टाटा मोटर्सची कमाल, 40 लाख गाड्यांच्या उत्पादनाचा विक्रम

| Updated on: Oct 25, 2020 | 3:52 PM

टाटा मोटर्सने 1991 साली पहिली कार लाँच केली होती. आतापर्यंत टाटाने अनेक कार लाँच केल्या आहेत. या कार्सना देशभरात मोठी पसंतीदेखील मिळाली.

टाटा मोटर्सची कमाल, 40 लाख गाड्यांच्या उत्पादनाचा विक्रम
Follow us on

मुंबई : टाटा मोटर्सने 1991 साली पहिली कार लाँच केली होती. आतापर्यंत टाटाने अनेक कार लाँच केल्या आहेत. या कार्सना देशभरात मोठी पसंतीदेखील मिळाली. आता या कंपनीने उत्पादनाच्या बाबतीत मोठा विक्रम केला आहे. (Tata Motors crosses 40 Lakhs cars production milestone)

कपंनीने आतापर्यंत 40 गाड्यांचे उत्पादन केले आहे. त्यापैकी 10 लाख गाड्यांचे उत्पादन मागील पाच वर्षात करण्यात आले आहे. यामध्ये टियागो, टिगॉर, नेक्सॉन, नेक्सॉन ईव्ही, हॅरियर आणि ऑलट्रोजसारख्या कार्सचा समावेश आहे.

याप्रसंगी टाटा मोटर्सकडून सांगण्यात आले आहे की, कंपनीने आतापर्यंत इंडिका, सिएरा, सुमो, सफारी आणि नॅनोसारख्या मॉडल्सच्या गाड्यांचे उत्पादन केले आहे. टाटा मोटर्सने 2005-06 मध्ये पॅसेंजर व्हेईकल्स सेगमेंटमध्ये 10 लाख गाड्यांचे उत्पादन करण्याचा माईलस्टोन गाठला होता.

टाटा मोटर्सने 2015 साली कंपनीने 30 लाख गाड्यांचे उत्पादन पूर्ण केले. कंपनीने उत्पादनाच्या बाबतीत नुकताच 40 लाखांचा आकडा गाठला आहे. याचाच अर्थ गेल्या पाच वर्षात कंपनीने 10 लाख गाड्यांचे उत्पादन केले आहे.

टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल्स बिजनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले की, टाटाने जी कामगिरी केली आहे, ती कंपनीच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवणारी आहे. उत्पादनात अशी कामगिरी करणाऱ्या देशात खूपच कमी मोटार कंपन्या आहेत.

गेल्या काही काळात टाटाने वेगवेगळे प्रोडक्ट्स जगासमोर मांडले. कंपनीने अनेक चॅलेंज स्वीकारले आणि पूर्णदेखील केले. यशस्वी प्रयोग केले. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो टाटाच्या सिएरा, इस्टेट, सफारी, इंडिका आणि नॅनो कारचा.

टाटा मोटर्सचे महाराष्ट्रात चिखली (पुणे) आणि रांजणगाव (पुणे) या दोन ठिकाणी तसेच गुजरातमधील साणंद येथे मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट आहेत. आगामी काळात कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. देशात इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या क्षेत्रात टाटा मोटर्सला नेतृत्व करायचं आहे, हेच कंपनीचं पुढील टार्गेट आहे.

संबंधित बातम्या

आत्मनिर्भर भारत! मर्सिडीजच्या कार महाराष्ट्रात असेंबल होणार

ठरलं! रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित Meteor 350 लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Swift limited Edition : शानदार ब्लॅक थीमसह नवीन मारुती स्विफ्ट लाँच

BMW ची सर्वात किफायतशीर सेडान लाँच, किंमत फक्त…

दिवाळीपूर्वी होंडाच्या कारवर 2.5 लाखांची सूट

(Tata Motors crosses 40 Lakhs cars production milestone)