मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) त्यांची सर्वात जास्त विकली जाणारी हॅचबॅक कार स्विफ्टचं स्पेशल एडिशन लाँच केलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, स्विफ्टचं स्पेशल एडिशन ब्लॅक थीमसह लाँच करण्यात आलं आहे.
1/5

मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) त्यांची सर्वात जास्त विकली जाणारी हॅचबॅक कार स्विफ्टचं स्पेशल एडिशन लाँच केलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, स्विफ्टचं स्पेशल एडिशन ब्लॅक थीमसह लाँच करण्यात आलं आहे.
2/5

नवी स्विफ्ट कार जुन्या स्विफ्टपेक्षा शानदार असली तरी जुन्या स्विफ्टपेक्षा थोडी महाग आहे. नवी स्विफ्ट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 24,999 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्विफ्ट कारची एक्स-शोरूम किंमत 5.19 लाख ते 8.02 लाख रुपयांपर्यंत आहे.
3/5

कंपनीने या कारमध्ये काळ्या रंगाचा वापर करुन कारला अधिक शानदार बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ब्लॅक थीम असलेल्या या नव्या स्विफ्टमध्ये ग्लॉसी ब्लॅक बॉडी किट, स्पॉलर, बॉडी साइड मॉल्डिंग, डोअर विजर आणि फॉग लॅम्पसारख्या अॅक्सेसरीज मिळणार आहेत.
4/5

कंपनीने या कारमध्ये कोणत्याही प्रकारचे अभियांत्रिकी (मेकॅनिकल) बदल केलेले नाहीत. परंतु काही कॉस्मॅटिक बदल करण्यात आले आहेत. स्टँडर्ड व्हेरिएंटच्या तुलनेत लिमिटेड एडिशन मॉडेल जास्त बोल्ड आणि डायनॅमिक आहे.
5/5

मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक (मार्केटिंग आणि सेल्स) शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, "लाँचिंगनंतर भारतीय बाजारात स्विफ्टने चांगलाच दबदबा निर्माण केला. प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये या कारची चांगली पकड आहे. स्विफ्टच्या तीन जनरेशनमध्ये या कारचे फिचर्स, लुक आणि तंत्रज्ञानात (टेक्नोलॉजी) बरेच बदल केले आहेत. लाँचिंगपासून आतापर्यंत स्विफ्टच्या 23 लाखांहून अधिक मॉडेलची विक्री झाली आहे".