Tata Motors लवकरच Altroz आणि Nexon चं डार्क एडिशन लाँच करणार, नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 01, 2021 | 4:52 PM

टाटा मोटर्स (Tata Motors) आपल्या डार्क एडिशनमध्ये तीन मॉडेल्सचा समावेश करणार आहे. (Tata Motors going to launch Altroz and Nexon in Dark Edition soon)

Tata Motors लवकरच Altroz आणि Nexon चं डार्क एडिशन लाँच करणार, नव्या मॉडेलमध्ये काय असेल खास?
Tata-Altroz

मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) आपल्या डार्क एडिशनमध्ये तीन मॉडेल्सचा समावेश करणार आहे. नुकतीच एक बातमी समोर आली आहे की, कंपनी Nexon EV चं डार्क एडिशन बाजारात सादर करणार आहे. ताज्या माहितीनुसार, कंपनी आता अल्ट्रॉज (Altroz) आणि नेक्सॉनचंदेखील डार्क एडिशनही लाँच करणार आहे. असं म्हटलं जात आहे की, जुलैमध्ये कंपनी या कारच्या डार्क व्हेरिएंटच्या किंमती जाहीर करु शकते. (Tata Motors going to launch Altroz and Nexon in Dark Edition soon)

टाटा मोटर्सने याआधी Harrier Dark Edition सादर केलं आहे. असं म्हटलं जात आहे की, अल्ट्रॉज आणि नेक्सॉनला देखील तोच रंग मिळेल. असा विश्वास व्यक्त केला जात आहे की, या गाड्यांच्या इंजिनमध्ये कोणताही बदल होणार नाही. याचा अर्थ इंजिन आणि गीअरबॉक्स तेच राहील. नेक्सॉन आणि अल्ट्रॉजचं डॉर्क एडिशन स्टँडर्ड 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डीझेलमध्ये उपलब्ध असतील.

किंमती 15 ते 30 हजार रुपयांनी वाढणार

Nexon EV Dark Edition संदर्भात असेही म्हटले जात आहे की, या कारमध्येदेखील कोणतेही यांत्रिक बदल होणार नाहीत. सध्या किंमतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. येत्या काही आठवड्यांत त्याच्या किंमतीबाबत निर्णय घेण्यात येईल. असं म्हटलं जात आहे की, स्टँडर्ड एडिशनच्या तुलनेत डार्क एडिशनची किंमत 15 ते 30 हजार रुपयांनी जास्त असू शकते.

Tata Motors ची अवघ्या 5 लाखात दमदार SUV

भारतात SUV सेगमेंट आता खूपच लोकप्रिय झालं आहे. ह्युंदाय क्रेटा (Hyundai Creta), किया सेल्टॉस (Kia Seltos), किया सोनेट (Kia Sonet), ह्युंदाय वेन्यू (Hyundai Venue), निसान मॅग्नाईट (Nissan Magnite) या SUVs ने भारतीय मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घातला आहे. या वाहनांच्या विक्रीबाबतची आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येईल की, आता प्रीमियम SUV भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळेच भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने Ignis आणि अर्बन SUV लाँच केली आहे. परंतु आता टाटा (Tata) कंपनीदेखील या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. टाटा आणि ह्युंदाय या दोन वाहन उत्पादक कंपन्या लवकरच भारतीय मार्केटमध्ये दोन नव्या SUV लाँच करणार आहेत.

टाटा ज्या SUV ला मार्केटमध्ये उतरवण्याची तयारी करत आहे त्या एसयूव्हीचं नाव HBX असं आहे. या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे या कारची किंमत. ही कार अवघ्या 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या किंमतीत भारतीय मार्केटमध्ये लाँच केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या कारचे काही फीचर्स हे टाटाच्याच नेक्सॉनप्रमाणे असतील. परंतु या कारचा प्रिमियम लुक ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करेल, यात शंका नाही.

इतर बातम्या

उद्यापासून तुमच्या आवडत्या गाड्या होणार महाग; मारुतीपासून हिरोपर्यंत कंपन्यांनी घेतला दरवाढीचा निर्णय

टाटा मोटर्स बनवणार 15 हायड्रोजन आधारीत इंधन सेल बस, आयओसीएलचे आदेश

(Tata Motors going to launch Altroz and Nexon in Dark Edition soon)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI