आधी भारतात धुमाकूळ, आता टाटांची भारदस्त कार नेपाळमध्येही लाँच, किंमत किती?

या गाड्यांच्या बॅटरीवर नेपाळमध्ये 8 वर्ष किंवा 1,60,000 किमी इतकी वॉरंटी दिली आहे. इतकंच नाही तर इलेक्ट्रिक वाहनावर तीन वर्ष किंवा 1,25,000 किमी वॉरंटी आहे.

आधी भारतात धुमाकूळ, आता टाटांची भारदस्त कार नेपाळमध्येही लाँच, किंमत किती?
Tata Motors Nexon EV

मुंबई : टाटा मोटर्सने (Tata Motors) आपली भारदस्त कार Nexon EV नेपाळमध्ये लाँच केली आहे. या गाडीची नेपाळमधील किंमत NPR 35.99 म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 22.50 लाख रुपये इतकी आहे. Tata Nexon EV ही गाडी तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये XM, XZ+ आणि XZ+ Lux यांचा समावेश आहे.

या गाड्यांच्या बॅटरीवर नेपाळमध्ये 8 वर्ष किंवा 1,60,000 किमी इतकी वॉरंटी दिली आहे. इतकंच नाही तर इलेक्ट्रिक वाहनावर तीन वर्ष किंवा 1,25,000 किमी वॉरंटी आहे.

नेपाळमध्ये टाटा सिपरडी ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून या गाड्यांची विक्रीला सुरुवात करणार आहे. टाटा मोटर्सने आधीच NPR 25,000 च्या रिफंडेबलवर बुकिंग सुरुही केलं आहे.

नवी इलेक्ट्रिक कार

नेक्सॉन EV महिंद्रा E20 आणि ह्युंडाई कोना एसयूव्ही शिवाय नेपाळमध्ये निर्यात होणारी भारताची ही नवी इलेक्ट्रिक कार आहे. आम्हाला नेपाळमध्ये आमची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही Nexon EV लाँच करताना आनंद होत आहे, असं टाटा मोटर्सने म्हटलं आहे. अत्याधुनिक कार ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला.

ही गाडी सर्वोत्तम डिझाईन, फीचर्स, सुरक्षा व्यवस्था, आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव देईल. त्यामुळे ग्राहक या गाडीकडे आकर्षित होती. या गाडीत पूर्ण चार्जिंग नेटवर्क बसवण्यात आलं आहे. या सर्व सुविधांमुळे ग्राहकांना ही कार नक्की भावेल, असं कंपनीने म्हटलं आहे.

अत्याधुनिक सुविधा 

टाटा मोटर्सची आगामी इलेक्ट्रिक वाहनांची सुरुवात, देशभरात अत्याधुनिक डीसी चार्जर आणि होम चार्जिंग सुविधेसह नेपाळमध्ये नवी क्रांती घडवेल. नेक्सॉन ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. एप्रिल आणि जूनच्या पहिल्या तिमाहीत 1716 कारची विक्री झाली.

टाटा मोटर्सने नुकतंच भारतात नेक्सॉन ईव्हीचं डार्क व्हेरिएंट लाँच केलं होतं. ज्याचं नाव नेक्सॉन डार्क आहे. या कारची किंमत 10.40 लाख रुपये इतकी आहे.

संबंधित बातम्या  

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क कमी करणार भारत सरकार, कंपनीला करावे लागेल केवळ हे काम

केवळ 25 हजारांच्या डाउन पेमेंटवर घरी आणा रॉयल एनफील्ड क्लासिक 350, महिन्याला द्यावे लागतील फक्त एवढे रुपये

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI