Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती

तुम्ही टाटा कंपनीची नवीन कार किंवा एसयूव्ही (SUV) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. दिग्गज वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने 1 सप्टेंबर 2026 पासून आपल्या सर्व व्यावसायिक गाड्यांच्या किंमतीत तब्बल 25 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती
| Edited By: | Updated on: Aug 25, 2026 | 8:54 PM

वाढती महागाई आणि वाहनांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या (Input Cost) खर्चात झालेली वाढ यामुळे टाटा मोटर्सने हा निर्णय घेतला आहे. या दरवाढीचा फटका पेट्रोल-डिझेल (ICE) मॉडेल्ससह इलेक्ट्रिक वाहनांनाही (EV) बसणार असून, नवीन दर पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून संपूर्ण देशात लागू होतील.

देशातील दिग्गज वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे. कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, येत्या 1 सप्टेंबर 2026 पासून टाटाच्या सर्व कार आणि एसयूव्ही (SUV) मॉडेल्सच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही दरवाढ वाहनांच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंट्सनुसार कमाल 25,000 रुपयांपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे, या दरवाढीचा फटका केवळ पेट्रोल-डिझेल (ICE) गाड्यांनाच नाही, तर टाटाच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक वाहनांनाही (EV) बसणार आहे. देशातील मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये टाटाच्या गाड्यांना मोठी मागणी असल्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम ऑटोमोबाईल बाजारपेठेवर होणार आहे.

दरवाढीमागील मुख्य कारणे काय?

ह्युंदाई मोटर इंडियाने 19 ऑगस्ट रोजी सांगितले होते की ते सप्टेंबर 2026 पासून आपल्या संपूर्ण पोर्टफोलिओच्या किंमती 1 टक्क्यांपर्यंत वाढवतील. टाटा मोटर्सने या दरवाढीसाठी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील आर्थिक परिस्थितीचा दाखला दिला आहे.

कच्च्या मालाच्या खर्चात वाढ: वाहनांच्या निर्मितीसाठी लागणारे स्टील, ॲल्युमिनियम, प्लास्टिक आणि इतर सुट्या भागांच्या किंमतीत गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे.

उत्पादन खर्च वाढणे: जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि वाढती लॉजिस्टिक किंमत यामुळे कंपन्यांचा वाहन निर्मितीचा एकूण खर्च वाढला आहे. हा वाढलेला बोजा अंशतः ग्राहकांवर टाकणे आवश्यक बनल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

दुसऱ्यांदा किमतीत वाढत

यापूर्वी जूनमध्ये कंपनीने आयसीई आणि ईव्ही दोन्ही मॉडेल्सच्या किंमतीत 1.5 टक्के वाढ जाहीर केली होती. ही वाढ 1 जुलै 2026 पासून लागू करण्यात आली आहे.

‘या’ गाड्यांच्या किंमतींवर होणार थेट परिणाम

टाटा मोटर्स भारताच्या कार बाजारात दुसऱ्या क्रमांकावर असून, तिच्या अनेक गाड्या बेस्ट सेलर आहेत. 1 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या दरांचा फटका खालील मॉडेल्सना बसेल

बजेट आणि हॅचबॅक मॉडेल्स: टाटा टियागो आणि टिगोर यांसारख्या बजेट कार्सच्या किंमतीत आंशिक वाढ होईल. लोकप्रिय SUV सेगमेंट: देशात सर्वाधिक विकली जाणारी टाटा पंच आणि टाटा नेक्सॉन यांच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रीमियम सेगमेंट: टाटा हॅरियर आणि सफारी या फ्लॅगशिप एसयूव्ही खरेदी करताना ग्राहकांना आता थेट 25,000 रुपयांपर्यंत अधिक रक्कम मोजावी लागेल.

इलेक्ट्रिक वाहने (EV): नेक्सॉन ईव्ही, पंच ईव्ही आणि टियागो ईव्ही या गाड्यांच्या किमती देखील बॅटरीच्या कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चामुळे वाढणार आहेत.

ग्राहकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत सुवर्णसंधी

ऑटोमोबाईल क्षेत्रातील विश्लेषकांच्या मते, जर तुम्ही टाटाची नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर 31 ऑगस्ट 2026 पूर्वी ती बुक करणे फायदेशीर ठरेल. सध्या चालू असलेल्या ऑगस्ट महिन्यातील फेस्टिव्ह ऑफर्सचा लाभ घेऊन ग्राहक लाखो रुपयांची बचत करू शकतात. 1 सप्टेंबरनंतर मात्र डिलिव्हरी घेताना नवीन वाढीव दर लागू होतील.

 

Follow Us