Tata Nexon | सुरक्षा कसोटीवर खरी उतरली का Tata Nexon? किती मिळाले रेटिंग

Tata Nexon | Tata Motors ची Tata Nexon एक दमदार एसयुव्ही आहे. देशात केंद्र सरकारने कार कंपन्यांसाठी सेफ्टी टेस्टची अट घातली आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका बसने टाटा नेक्सॉनला टक्कर मारल्यानंतर दोघांची काय अवस्था झाली, ते समोर आले आहे.

Tata Nexon | सुरक्षा कसोटीवर खरी उतरली का Tata Nexon? किती मिळाले रेटिंग
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 2:07 PM

नवी दिल्ली | 1 डिसेंबर 2023 : कार खरेदी करण्यापूर्वी आपण हा विचार करतोच की ती दमदार आणि मजूबत आहे की नाही? चारचाकी खरेदी करताना आपण आधुनिक फीचर तर चेक करतोच पण सुरक्षेविषयी पण सजग असतो. अनेकदा कार स्वस्त मिळते. पण ती सुरक्षा मानकांवर खरी उतरत नाही. ग्राहक आता सुरक्षा मानकांचा पण विचार करतो. केंद्र सरकारने पण कारच्या क्रॅश टेस्टला हिरवा कंदिल दाखवला आहे. यामध्ये टाटा नेक्सॉनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात बसची नेक्सॉनला जोरदार धडक दाखविण्यात आली आहे. या परीक्षेत नेक्सॉन खरी उतरली का?

Bharat NCAP

हे सुद्धा वाचा

Bharat NCAP ही 1 ऑक्टोबर 2023 रोजी लागू करण्यात आली आहे. या कार्यक्रमातंर्गत आयात होणाऱ्या कारची क्रॅश टेस्ट करण्यात येणार आहे. कार किती मजबूत आहे, त्यावर या चारचाकीला 0 ते 5 या दरम्यान त्यांना सेफ्टी रेटिंग देण्यात येणार आहे. पहिल्या बॅचमधील वाहनांची क्रॅश टेस्ट 15 डिसेंबर रोजी सुरु होण्याची शक्यता आहे.

टाटा मोटर्सला किती स्टार रेटिंग

टाटा मोटर्सच्या जवळपास सर्वच कारला Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. टाटाच्या अनेक कार दणकट आणि मजबूत आहेत. नुकतेच ऑटो ऑफिशियल नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका बसने Tata Nexon ला जोरदार धडक दिल्याचे दिसते.

धडकेत नुकसान तरी कोणाचे?

टाटाच्या नेक्सॉनला बसने धडक दिली. तुम्हाला वाटले असेल की या धडकेत जास्त नुकसान कारचे होणार हे अगदी स्पष्ट आहे. बसला या धडकेचा मोठा फटका बसला नसणार. पण अगदीच असे नाही. बसने नेक्सॉनला धडक दिली, हे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. पण टाटा नेक्सॉनचे मोठे नुकसान झालेले नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर टाटा मोटर्सच्या कार का दणकट आहेत? त्यावर ग्राहक का फिदा आहेत, हे समोर येईल.

  • रेटिंग काय – ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. तर लहान मुलांच्या सेफ्टीबाबत या कारला 3 स्टार रेटिंग मिळाले आहे.
  • किती देत मायलेज – काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता. नवीन 2023 Nexon Facelift मॉडल 17.01 kmpl ते 24.08 kmpl पर्यंतचे मायलेज देते.
  • Tata Nexon किंमत – टाटा मोटर्सने काही महिन्यांपूर्वी नेक्सॉनचे फेसलिफ्ट मॉडल ग्राहकांसाठी बाजारात उतरवले. या SUV ची किंमत 8 लाख 10 हजार (एक्स-शोरूम) रुपयापासून सुरु होते.
Non Stop LIVE Update
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.