मायक्रो SUV सेगमेंटमध्ये या कारचा नंबर वन, सुरक्षित आणि किंमतही इतकी कमी
कार ग्राहकांना आता कारच्या मायलेज आणि इतर फिचर्सपेक्षा सुरक्षा महत्वाची वाटत आहे. तसेच शहरातील पार्किंगची समस्या पाहून लोक आता छोट्या आकाराच्या सुव्ह खरेदी करत आहेत.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये मायक्रो एसयुव्ही सेगमेंट वेगाने लोकप्रिय होत चालला आहे. याच्या केंद्रस्थानी साल 2025 मध्ये टाटा पंच (Tata Punch)राहिली आहे. संपूर्ण वर्षात साल 2025 मध्ये टाटा पंचने 1.73 लाख यूनिट्सची विक्री नोंदवली आहे. त्यामुळे टाटा पंच मायक्रो SUV सेगमेंटमध्ये जास्त विक्री झालेली कार बनली आहे. या कारची किंमत 5.49 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम)सुरु होत आहे. ही कार डिझाईन आणि फिचर्स आणि सेफ्टीच्या बाबतील ग्राहकांची पहिली पसंद बनली आहे.
SUV-सारखा लुक आणि सिटी-फ्रेंडली साईज
टाटा पंचची सर्वात मोठी खासियत म्हणजे या कारचे बोल्ड आणि मस्क्युलर डिझाईन होय. या कारचा छोटा आकार असूनही हिचे उंच ग्राऊंड क्लियरन्स, मजबूत बॉडी आणि आकर्षक फ्रंट ग्रिल या कारला कोणत्याही रस्त्यांसाठी उपयुक्त बनवत आहेत. ही कार शहरातील गर्दीतील रस्ते आणि ग्रामीण क्षेत्रातील ओबडधोबड रस्ते दोन्हींवर सहज धावू शकते. यामुळे तरुण आणि फॅमिली अशा दोन्ही वर्गांमध्ये ही कार लोकप्रिय बनली आहे.
सेफ्टीतही विश्वासार्ह
टाटा पंचला 5-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग मिळाली आहे. या कारमध्ये ड्यूअल एअरबॅग, मजबूत तयार केलेली बॉडी आणि ड्रायव्हींग स्टेबिलिटीमुळे ही या सेगमेंटमध्ये सर्वात सुरक्षित सुव्ह कार बनली आहे. सेफ्टीसाठी महत्व देणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार एक विश्वासार्ह पर्याय बनली आहे.
परफॉर्मेंस आणि मायलेज
या कारमध्ये 1.2-लिटरचे पेट्रोल इंजिन लावण्यात आले आहे. जे दैनंदिन ड्रायव्हींगसाठी संतुलित पॉवर आणि चांगला मायलेज देते. कमी मेन्टेनन्स कॉस्टमुळे ही कार बजेट फ्रेंडली कार म्हणून ओळखली जाते. पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांनी या कारला प्राधान्य दिले आहे.
फिचर्स आणि ब्रँड व्हॅल्यू
टाटा पंचच्या डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, मोठा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस कनेक्टीव्हीटी आणि SUV-स्टाईल इंटेरिअर्स सारखे फिचर्स मिळत आहेत. टाटाचे मजबूत सर्व्हीस नेटवर्क आणि भरोसेमंद ब्रँड इमेजने देखील विक्रीला प्रोत्साहन मिळालेले आहे.
विक्रीचे आकडे
साल 2025 मध्ये टाटा पंचच्या 1.73 लाख यूनिट्स विक्री झाली आहे. टाटा पंच सर्व स्पर्धकांना मागे टाकत मायक्रो माइक्रो SUV सेगमेंटमध्ये नंबर वन मिळवला आहे. त्यामुळे आता स्पष्ट होते की भारतीय ग्राहक आता छोटी, मजबूत आणि सुरक्षित सुव्हला अधिक पसंद करत आहेत.
