AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील टॉप-5 सुपरफास्ट चार्जिंग इलेक्ट्रिक कार… सिंगल चार्जवर 1 हजार किमीची रेंज

इलेक्ट्रिक कारमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तिची रेंज असते. इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी बराच अवधी लागत असतो. इलेक्ट्रिक कारमध्ये वापरण्यात येत असलेले तंत्रज्ञान नवीन असल्याने हा वेळ लागत असला तरी, या वेळेमध्येही हळूहळू घट होत आहे.

जगातील टॉप-5 सुपरफास्ट चार्जिंग इलेक्ट्रिक कार... सिंगल चार्जवर 1 हजार किमीची रेंज
| Updated on: Jul 13, 2022 | 9:22 PM
Share

ऑटोमोबाईल (Automobile) मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कारच्या (Electric car) मागणीत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. पारंपारिक फ्यूअल बेस्ड कारएवजी लोक आता इलेक्ट्रिक कार्सच्या दिशेने वळाले आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल असल्यासोबत इंधनाचीही बचत होते, ग्राहकांचा इंधनावरील खर्च कमी होत असल्याने साहजिकच नागरिक आता इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तिची रेंज असते. इलेक्ट्रिक कारच्या बेटरीला चार्ज करण्यासाठी बराच अवधी लागत असतो. इलेक्ट्रिक कारमध्ये वापरण्यात येत असलेले तंत्रज्ञान नवीन असल्याने हा वेळ लागत असला तरी, वेळेतही आता हळूहळू घट होत आहे. या लेखात आपण सर्वात कमी वेळात जलद चार्ज (superfast charg) होत असलेल्या काही इलेक्ट्रिक कार्सची माहिती बघणार आहोत.

पोर्श टायकान प्लस

पोर्शची टायकान जर्मन लग्झरी स्पोर्ट्स कार निर्मात्यांची पहिली इलेक्ट्रिक कार आहे. टायकान पहिल्यापासूनच जगात सर्वाधिक जलद पध्दतीने चार्जिंग टेक्नीकसाठी लोकप्रिय कंपनी आहे. जर तुम्ही या कारला एक तासापर्यंत चार्ज केले तर युजर्सना 53 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळणार आहे. तर दुसरीकडे एचटी ऑटोच्या एका रिपोर्टनुसार, डिसी चार्जिंगने एका तासापर्यंत चार्ज केल्यास टायकान 1043 किमीपर्यंतची रेंज देउ शकणार आहे.

किआ ईव्ही 6 लाँग रेंज 2 डब्ल्यूडी

ईव्ही 6 साउथ कोरियाची ऑटो मोबाईल कंपनी किआची लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहे. किआ ईव्ही 6 देखील सुपरफास्ट चार्जिंगसह उपलब्ध होणारी जगातील काही इलेक्ट्रिक कारमधील एक आहे. एका तासापर्यंत चार्ज केल्यावर यापासून जवळपास 51 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळू शकते. जर युजर्स डीसी चार्जिंगचा वापर करत असतील तर सिंगल चार्जवर तब्बल 1046 किमीपर्यंतची रेंज मिळू शकते.

मर्सिडीज ईक्यूएस 580 4 मेटिक

मर्सिडीज ईक्यूएस 580 4 मेटिक एक लग्झरी इलेक्ट्रिक सेडन कार आहे. ही जगातील सर्वात चांगली इलेक्ट्रिक सेडन कार समजली जाते. एस-क्लास लग्झरी इलेक्ट्रिक कार देखील सुपरफास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे. ही एक तास चार्ज केल्यावर जवळपास 53 किमीपर्यंतची रेंज देते. तर एक तास डीसी चार्जिंग केल्यावर 788 किमीपर्यंत रेंज मिळते.

ह्युंदाई आयनिक 5 लांग रेंज 2 डब्ल्यूडी

ही कार एकदा चार्ज केल्यावर 59 किमीपर्यंतची रेंज देते. तर एक तास डीसी चार्जिंग केल्यावर तब्बल 933 किमीपर्यंतची रेंज देउ शकते.

टेस्ला मॉडल वाई लाँग रेंज ड्युअल मोटर

टेस्ला मॉडल ईव्ही जगातील दुसरी सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे. एकदा चार्ज केल्यावर गाडीला 54 किमीची रेंज मिळते. डीसी चार्जिंग केल्यावर एका सिंगल चार्जवर गाडी 595 किमीची रेंज मिळते.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....