AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंगल चार्जमध्ये 100KM रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक सायकलसाठी ग्राहकांच्या रांगा

भारतीय इलेक्ट्रिक सायकल स्टार्टअप व्होल्ट्रो मोटर्सने (VOLTRO MOTORS) या आर्थिक वर्षात 10 कोटी रुपयांच्या विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे.

सिंगल चार्जमध्ये 100KM रेंज, 'या' इलेक्ट्रिक सायकलसाठी ग्राहकांच्या रांगा
voltro electric cycle
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 7:40 AM
Share

मुंबई : भारतीय इलेक्ट्रिक सायकल स्टार्टअप व्होल्ट्रो मोटर्सने (VOLTRO MOTORS) या आर्थिक वर्षात 10 कोटी रुपयांच्या विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे. ब्रँडने म्हटले आहे की, लहान शहरांमध्ये विशेषत: लॉकडाऊन उठवल्यानंतर इलेक्ट्रिक सायकलींच्या मागणीत वाढ होत आहे. व्होल्ट्रो मोटर्सचे संस्थापक आणि डिरेक्टर प्रशांत म्हणाले की, सुरुवातीला लॉकडाऊनमुळे व्यवसायाला फटका बसला होता, पण आता विक्री झपाट्याने वाढत आहे. “व्होल्ट्रो इलेक्ट्रिक सायकलच्या मागणीत वाढ होत आहे. आम्ही सध्या छोट्या शहरांमध्ये डीलर्स आणि वितरक (डिस्ट्रीब्यूटर्स) शोधत आहोत. (This electric cycle startup says small towns showing higher demand for e-bikes)

व्होल्ट्रो इलेक्ट्रिक सायकल सिंगल चार्जवर 75 किमी ते 100 किमी पर्यंतची रेंज देते आणि या सायकलचं टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतकं आहे. ही सायकल लिथियम फॉस्फेट बॅटरी, मिड-ड्राइव्ह मोटरसह सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, ही सायकल हिल रायडिंग, सिटी रायडिंग आणि ऑफ रोड रायडिंगसाठी योग्य आहे. या ई-बाईकची किंमत 35,000 रुपये इतकी आहे.

व्होल्ट्रो इलेक्ट्रिक सायकल चार्ज करण्यासाठी 700 वॅट वीज वापरली जाते, जी 1 युनिटपेक्षा जास्त आहे. ही सायकल तीन तासात चार्ज होऊ शकते. कंपनीचा दावा आहे की, ही सायकल चार्ज करण्यासाठी सरासरी 4 रुपये इतका खर्च येतो. हेच या सायकलची लहान शहरांमध्ये मागणी वाढण्यामागचे प्रमुख कारण आहे.

प्रशांत म्हणाले की, ई-बाईकची स्थानिक पातळीवर सहज दुरुस्ती करता येते किंवा त्याचे भागही बदलता येतात. “एका वर्षाच्या वॉरंटी कालावधीत कंट्रोलर आणि मोटरमध्ये काही समस्या असल्यास, आम्ही संपूर्ण सायकल बदलतो. त्यामुळे आमच्या चॅनेल पार्टनर्सना तांत्रिक सहाय्य देण्यासाठी आम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाही.

कंपनीने ऑगस्ट 2020 मध्ये देशात आपले काम सुरू केले आणि 35 लाखांच्या उलाढालीसह पहिले आर्थिक वर्ष पूर्ण केले. जर परिस्थिती सामान्य राहिली तर कंपनी 8 ते 10 कोटींच्या विक्रीला स्पर्श करू शकते, असे प्रशांत यांचे मत आहे. ते म्हणाले की, “आम्ही ऑनलाइन विक्री देखील करत आहोत आणि लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बँडविड्थ तयार करत आहोत. तसेच आमची कंपनी आपली ई-सायकल एका महिन्याच्या आत दक्षिण आफ्रिकेला पाठवणेदेखील सुरू करेल.”

चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस उत्पादन दरमहा 400 युनिट वरून 1,000-1,500 युनिट पर्यंत वाढवण्यासाठी कंपनी दिल्लीत आपल्या फॅक्टरीचा विस्तार करत आहे.

संबंधित बातम्या

इंधन दरवाढीमुळे नागरिक हैराण, मुंबईतल्या पठ्ठ्याकडून बॅटरीवर चालणाऱ्या सायकलची निर्मिती, किंमत…

सिंगल चार्जमध्ये 70 ते 100 किमी धावेल ही सायकल, जाणून घ्या याचे खास फिचर्स

‘या’ इलेक्ट्रिक सायकलसमोर ऑटो फेल, एकदा चार्ज केल्यावर 100 किमी धावणार

(This electric cycle startup says small towns showing higher demand for e-bikes)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.